November 8, 2024
The intention is to make 300 acres of land salt-free
Home » 300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस
काय चाललयं अवतीभवती

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

शिरोळ – धरणगुत्ती मार्गावरील सरळी भागातील 300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस माऊली श्री दत्तगुरु क्षारपड जमीन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्याचा प्रकल्प हाती घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना नव संजीवनी देण्याचे सुरू केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे क्षारपडमुक्त जमीन करण्याचे श्रेय कोणीही लाटू नये केवळ गणपतराव पाटील यांच्यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होत आहेत.

माजी आमदार उल्हास पाटील

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, तालुक्यातील सर्वच गावातील शेतजमिनी अति पाण्यामुळे क्षारपड व मीठमोड झाल्या या जमिनीमध्ये पिके येत नसल्याने शेतकरी हे आर्थिक संकटात सापडत चालले वर्षानुवर्षे जमीन नापिक बनत चालल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटत गेला अशा शेतकऱ्यांची आर्थिक सुभता वाढावी याकरिता श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतरावदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन क्षारपड जमीन सुपीक करण्याच्या प्रकल्पाची माहिती घेऊन हा प्रकल्प तालुक्यात राबवून हजारो हेक्टर जमिनी सुपीक बनवल्या या जमिनीत अनेक पिके शेतकरी घेऊन आपली आर्थिक सुबकता साधत आहेत. त्यामुळे गणपतराव पाटील यांनी सुरू केलेल्या या सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली या क्षारपड मुक्त जमीन प्रकल्पाचा आदर्श संपूर्ण देशाने घेतला आहे.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात क्षारपडमुक्त जमिनीचा प्रकल्प राबविण्यात येत असून यास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिरोळमधील क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची सुरुवात जमीन सर्वे करण्याच्या माध्यमातून झाली.

श्री दत्त कारखाना व जयसिंगपूर उदगाव बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण न आणता अर्थसहाय्य करून क्षारपड जमिनी सुपीक करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला प्रथमता शिरोळ येथे हा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पण यश मिळाले नाही पहिल्या टप्प्यात बूबनाळ व शेडशाळ येथे हा प्रकल्प साकारला तेथील शेतकऱ्यांनाही जमिनीचे महत्व पटवून द्यावे लागले. सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सहकार्याने केलेल्या क्षारपडमुक्त जमिनीत अनेक पीक घेत आहेत तालुक्यात तीस हजार एकर जमीन क्षारपड झाली आहे त्यापैकी 7000 एकर जमीन क्षारपड मुक्त करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे क्षारपड मुक्त जमीन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी 24 हजार रुपये अनुदानही मिळवून दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सुपीक करण्याकरता सामूहिकरित्या प्रयत्न करण्यासाठी एकत्र येऊन हा प्रकल्प राबवण्याची गरज आहे. त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील.

यावेळी माझ्यासोबत माजी आमदार उल्हास पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दत्तचे संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, सर्वश्री नगरसेवक राजेंद्र माने, पंडीत काळे , प्रकाश गावडे, राजाराम कोळी, माजी सरपंच गजानन संकपाळ, धनाजी पाटील नरदेकर, विजय आरगे, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, दिलीप माने, दरगु पाटील, काशिनाथ भोसले, अमर शिंदे, बाळासो कोळी, उदय संकपाळ, दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, संजय चव्हाण, यशवंत उर्फ बंटी देसाई, गुरुदत्त देसाई, संभाजी सावंत, अरुण माळी, राजाराम कोळी, सुभाष आरगे, सत्याप्पा आरगे, अनिल पाटील, अरवींद खडके, बाळासो पाटील, विजय पाटील , रविंद्र पाटील, देवाप्पा खडके, सुरेश खडके, बाळासो कोरे, कृष्णांत माने, आण्णासो काळे, संभाजी संकपाळ, शिवाजी नारंगीकर, श्रीपती माने, आनंदराव कोळी, गजानन कोळी, बाबासो पुंदे यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading