स्पर्धेतील यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्याची उर्जा या स्पर्धेतून मिळते. कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले यशाचे सर्व श्रेय हे मी त्यांना देऊ इच्छिते.
केतकी सोगावकर
मिसेस फिटनेस दिवा 2021
पुणे येथे झालेल्या मिसेस महाराष्ट्र इम्पेस ऑफ महाराष्ट्र 2021 स्पर्धेत केतकी सोगावकर यांना मिसेस फिटनेस दिवा 2021 हा किताब मिळाला. या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातून 50 विवाहित सौंदर्यवतींची निवड करण्यात आली होती. आठ ऑगस्टरोजी ही स्पर्धा घेण्यात आली. केतकी यांना अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मानाचा मुकुट प्रदान करण्यात आला.
केतकी सोगावकर या एचपी कंपनीमध्ये प्रशासकिय विभागात कार्यरत असून महिलांसाठी त्या झुंबा क्लासेसही चालवतात. पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना केतकी म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या फिटनेसकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतः खंबीरपणे उभे राहाणे गरजेचे आहे.
या स्पर्धेतील यशामुळे माझा आत्मविश्वास बळावल्या असल्याचे केतकी म्हणाल्या. आपल्या यशाचे श्रेय केतकी त्यांच्या कुटुंबाला देतात. पती केरेन, मुलगी लिशा व आई, वडील, सासू, भाऊ यांची मोलाची साथ मिळाल्यामुळेच त्या स्पर्धेत यश मिळवू शकल्या असे त्या मानतात.
दिवा प्रेजेन्ट्सचे संचालक कार्ल आणि अंजना मास्करेन्ह्स यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिलांनी सक्षम व्हावे, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत व्हावा, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढे यावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.