पुन्हा नव्याने... वर्ष जुने ते गेले आणिक वर्ष नवे हे आले स्वागतास मग त्याच्या आता सारेच सज्ज झाले एक जाताच दुसरा येतो काळाची ही किमया चक्र निरंतर फिरत राहते आपसूक ते लिलया सरत्या वर्षांस हासत हासत निरोप देऊ आपण दिले घेतले त्याने जे जे वेचू सारे ते क्षण एक हासतो दुसरा रडतो दोन्ही अपुले डोळे दुःख करावे सुख मानावे मनास काही न कळे संकल्प नवे मनात करुनी जुन्या रुढींना मोडू माणुसकीची कास धरू अन मनामनाला जोडू मनी उमटल्या भावभावना संमिश्र अशा काही दिन हे अच्छे असणार पुढे दिली मनाने ग्वाही जुन्या क्षणांचे हिशोब पुसुनी पाटी कोरी करते पुन्हा नव्याने नवीन काही लिहीन त्यावर म्हणते. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.