September 15, 2024
Tips For success of Children sadashiv Panchal article
Home » …तर मुलं कधीच अपयशी होणार नाहीत
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

…तर मुलं कधीच अपयशी होणार नाहीत

आपली मुलं यशस्वी व्हावीत, यासाठीच आम्हा पालकांचा आटापीटा असतो. त्यासाठी मुलांनी मागितलेल्या गोष्टीला आपण लगेच ‘तथास्तु’ म्हणतो. पण त्यांनी मागितलेली गोष्ट ताबडतोब त्यांना पुरवणे, म्हणजे प्रेम नाही. मुलं यशस्वी व्हावीत, असं वाटतं असेल तर या गोष्टी मुलांना शिकवल्याच पाहिजेत.

सदाशिव बाळकृष्ण पांचाळ

(लेखक मुलांच्या बौद्धिक क्षमता विकासाच्या क्षेत्रात तज्ञ असून गेली २० वर्षे कार्यरत आहेत.)
मोबाईल – 9923590942

GREAT ‘ग्रेट’

आपली मुलं यशस्वी व्हावीत, यासाठीच आम्हा पालकांचा आटापीटा असतो. त्यासाठी मुलांनी मागितलेल्या गोष्टीला आपण लगेच ‘तथास्तु’ म्हणतो. पण त्यांनी मागितलेली गोष्ट ताबडतोब त्यांना पुरवणे, म्हणजे प्रेम नाही. मुलं यशस्वी व्हावीत, असं वाटतं असेल तर या गोष्टी मुलांना शिकवल्याच पाहिजेत. जसं माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा असतात, तसं भावी आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी ‘ग्रेट’ (GREAT) अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपण ‘ग्रेट’ म्हणजे काय ते समजून घेऊया.

G जी giving (देणे)

अगदी लहानपणापासून आपण मुलांना भरविताना ‘हा घास चिऊचा’, ‘हा घास काऊचा’ असं म्हणत भरवतो. तु नाही खाल्लास तर चिऊ किंवा काऊ खाईल अशी प्रेमळ धमकी देऊन मुलांनी खावे यासाठी प्रयत्न करत असतो. यातून ‘तुच खा, इतरांना देऊ नकोस’ असे संस्कार आपण मुलांवर करतो. आता हे बदलण्याची वेळ आली आहे. मुलांवर ‘देणे’ (giving) शिकवले पाहिजे.

‘दान’ हा फार पुण्याचा विषय आहे. काहीही हात उंचावून देण्याची सवय मुलांना लागली पाहीजे.
आपला एखादा जुना शर्ट मित्राला देता आला तर. त्या देण्यातून मिळणारा ‘आनंद’ अनूभवण्याची संधी आज दिली गेली पाहिजे. आपल्या जेवणाच्या डब्यातली भाजी देणे, कधी तरी एखाद्याची तिकीट काढणे, अशा अनेक गोष्टी करता येणे शक्य आहेत. आपण काय देऊ शकतो, यांचा विचार प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार करावी.

R आर READING (वाचन)

हल्ली मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात अभ्यासातील पुस्तकांचे वाचनही मुलं करत नाही.
परंतू ज्या मुलांना आजच्या स्पर्धेच्या युगात पुढे जायचे आहे, त्यांनी आपल्या अभ्यासातील वाचनाबरोबरच अवांतर वाचन केले पाहिजे. वाचन हे मेंदूचे खाद्य आहे. ते मेंदूला कमी-अधिक प्रमाणात मिळालेच पाहिजे. आपल्या ज्ञानात भर पडते. आकलनशक्ती वाढते. वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढते. जगावरील घडामोडी समजतात. लिखाणाची क्षमता वाढते. वाचनाचा वक्तृत्व विकसित करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

मोबाईल मधून बाहेर पडण्यासाठी ‘वाचन’ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आपली मुलं लहान असतील शक्य तितक्या लवकर वाचनाच वेड लावण, ही काळाची गरज आहे. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालकांनी वाचन केलं पाहिजे. कारण मुलं पालकांचं अनुकरण करत असतात. मुलांची निर्णय क्षमता विकसित करण्यासाठीही वाचनाचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणूनच म्हटले आहे की ‘ वाचाल तर वाचाल’.

E इ Exercise (व्यायाम)

माणसाला सुख मिळालं तर त्याचा उपभोग घेण्यासाठी तुमचे आरोग्य चांगले असणे, हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यात मुलांचे आरोग्य चांगले असण्यासाठी त्यांना व्यायामाची सवय लागणे गरजेचे आहे. मुलं लहान असतानाच या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत. मुलांमध्ये व्यायामात सातत्य असले पाहिजे, याचीही काळजी पालकांनी घ्यायला हवी.

व्यायामामुळे शरीरातील सदृढ तर राहतेच त्याचबरोबर मनही सदृढ असण्यासाठी योगा, प्राणायाम, साधना, यासारख्या गोष्टी कामी येतात. या सर्व गोष्टींची सवय मुलांना लावणे ही पालकांची जबाबदारी असेल. या सवयी मुलांना एकदा जडल्यास चुकीच्या सवयी कडे मुले वळणार नाहीत. जर जाणूनबुजून चांगल्या सवयी लावल्या नाहीत तर नकळत आपण वाईट सवयी कडे आकर्षित होऊ हे कळणारही नाही. वेळ गेल्यावर पश्र्चाताप करण्यापेक्षा वेळीच सावध झाल्यास चांगले रिझल्ट मिळतील.

A ए Appreciate प्रशंसा करणे

आजकाल स्पर्धा एवढी वाढली आहे की, दुसऱ्याने गाडी आणली, की बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं.
त्याच्या गाडीची मुक्त कंठाने प्रशंसा करायचे धाडस होत नाही. दुसऱ्याच्या चांगल्याला चांगले म्हणायला आज शिकवावे लागते.कोणी जेव्हा आपली प्रशंसा करतो, ती व्यक्ती आपल्याला आपली वाटते. कारण त्यांने आपले कौतुक केलेले असते. तसेच आपण समोरच्या व्यक्तीचे कौतुक केले तर आपणही त्या व्यक्तीला आपण आवडू शकतो. त्यामुळे एक रेपो तयार होऊन चांगला माणूस आपल्याला मिळू शकतो. यामुळे आपण दुसऱ्यांच कौतुक करणे, प्रशंसा करणे हा आपल्या आयुष्यातील एक काम आहे, हे ठरवून टाकायला हवे.

T टी Time management वेळेचे नियोजन

आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:मध्ये शिस्त रुजवली पाहिजे. यात प्रामुख्याने वेळेचे नियोजन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. वेळेच्या नियोजनाची सवय ही यशासाठी पहिली गोष्ट आहे. आपलं प्रत्येक काम वेळेवर करण्याची सवय लहानपणापासून लावण्याची गरज आहे.

या व्यतिरिक्त अनेक गोष्टी मुलांना शिकवायला हव्यात, परंतू या अत्यंत महत्त्वाच्या अन् प्राथमिक गोष्टी आहेत. वर दिलेल्या मुद्यांमध्येही अनेक गोष्टी विस्तारितपणे सांगता येण्यासारख्या आहेत. मुलांना काय शिकवायचे, अन् काय नाही हे असे हजार शब्दात सांगता येणार नाही. याबद्दल अधिक माहितीसाठी आपण मला संपर्क करू शकता.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कवी हबीब भंडारे यांच्या कवितांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश

चंद्राबाबूंचा नवा अवतार…

मेंटेनन्स…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading