येलीचा तोरा !! येलीन येढारलं! झाड दिसेना ! सोताले वानवे ! आव महारानीचा !! पोशिंदा झाड! शांत बिचारा! जारुन सोताले! महान विचारा ! ! येलीनं बाईचा ! उसनाचं तोरा ! तरीही म्हणे, सप्पा कायी! माहयाचं बाई!! कायी नाई सोताचं! मिजास भारी !! चटणीची न्याहारी !!! कवयित्री - विद्या भदाडे
येलीचा तोरा !! ( लाक्षणिक अर्थ )
येलीचा तोरा ही कविता स्त्री आणि पुरुष संबंधावर आधारीत आहे. काही स्त्रिया ह्या गृहिणी असतात. पण तरी देखील त्यांना अतिशय गर्व आणि अहंकार असतो. जेव्हा की,’ झाड’ अर्थात पुरुष हा ‘ कर्ता ‘ पुरुष आणि पोशिंदा म्हणजे कुटुंबाचे पोषण करणारा असतो. तो रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमवितो. पण तरीही त्याला कुठलाही अहंकार स्पर्श सुद्धा करीत नाही. पण ज्या घरगुती स्त्रिया पुरुषांच्या पैशावरती असतात. साधारणत: त्यांनाच अतिशय गर्व आणि अहंकार असतो. त्या काही माझचं सर्व या आविर्भावात असतात. जणू काही त्या ठिकाणी झाडाचं अस्तित्व नसत केवळ वेलिंचंच साम्राज्य अर्थात स्त्रियांचंच साम्राज्य असत. स्वतःला काहीही येत नसतांना स्वतःचं मेंढा मिरविणाऱ्या स्त्रिया समाजात वावरतांना दिसतात. ‘ मिजास भारी’ ही झाडीबोलीतील म्हण आहे
मिजास भारी अन् चटणीची न्याहारी !
म्हणजे उगाचंच जास्तीचा बाढेजाव करणारे लोक समाजात असतात तशाच ह्या स्त्रिया देखील असतात . उसणा श्रीमंतीचा आव आणून वागणाऱ्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीचं नसणाऱ्या शून्य असणाऱ्या स्त्रिया!! हे परजीवी वेलींना उद्देशून म्हंटलेल आहे.
वेढणे = येढारलं
येलीन = वेलिने
न्याहारी = सकाळचं नाश्ता
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.