मुंबई – 2022 सालचे 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. फीचर फिल्म्स, नॉन-फिचर फिल्म्स आणि सिनेमावरील लिखाण यासह विविध श्रेणींमधील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारे हे पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जातात.
70 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील मराठी चित्रपट विषयक ठळक मुद्दे :
मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये लक्षणीय ठसा उमटवला. अनेक चित्रपट विविध श्रेणींमध्ये प्रशंसेसाठी पात्र ठरले. उल्लेखनीय कामगिरी करणारे विजेते पुढील प्रमाणे :
फीचर फिल्म:
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: वाळवी
परेश मोकाशी दिग्दर्शित, मयसभा करमणूक मंडळी आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड निर्मित, वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. या चित्रपटाला रजत कमळ आणि 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नॉन-फिचर फिल्म
- सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक / ऐतिहासिक मांडणी / संकलन चित्रपट : आणखी एक मोहेंजोदडो
द गोवन स्टुडिओ आणि अशोक राणे प्रॉडक्शन निर्मित, अशोक राणे दिग्दर्शित चित्रपट, ‘आणखी एक मोहेंजोदडो’. ऐतिहासिक संकल्पनांचा धांडोळा घेणाऱ्या या चित्रपटाला रजत कमल आणि रु. 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे
- सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट: वारसा
सचिन बाळासाहेब सुर्यवंशी निर्मित आणि दिग्दर्शित वारसा या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार आणि रु. 2,00,000/- चा पुरस्कार विभागून देण्यात येईल. हा पुरस्कार कन्नड चित्रपट, ‘रंग विभोगा’ (मंदिर नृत्य परंपरा, निर्माता आणि दिग्दर्शक: सुनील नरसिंहचर पुराणिक) या चित्रपटाबरोबर विभागण्यात आला आहे.
- सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्तम निवेदन: मर्मर्स ऑफ द जंगल (MURMURS OF THE JUNGLE)
सोहिल वैद्य दिग्दर्शित, या माहितीपटाला रजत कमल आणि रु. 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटासाठी निवेदन करणारे सुमंत शिंदे यांनाही सर्वोत्कृष्ट निवेदन/व्हॉईस ओव्हरसाठी रजत कमल आणि रु. 2,00,000/- रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.