पुदिना…गुणांचा खजिना
पुदिना अर्थात मेंट म्हणून प्रसिद्ध असणारी ही वनस्पती स्वयंपाक घरात चवीसाठी, स्वादासाठी वापरली जाते. पुदिना मध्ये विपुल प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे. त्यामुळे डोळे चांगले राहतात. पुदिना मध्ये लोह चांगल्या प्रमाणात आहे. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज पुदिना खायला हरकत नाही. पुदिन्यांमध्ये मॅंगनीज देखील आहे. जे तुमच्या मेंदूचे आरोग्य चांगले ठेवायला मदत करते.
पुदिनामुळे पचन चांगले होते तसेच ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम चा त्रास आहे त्यांनी रोज पुदिना खावा. पुदिना खाल्ल्यामुळे त्वचेमधील तेल ग्रंथीचे कार्य मंदावते आणि पिंपल्स कमी येतात. श्वासांमधील दुर्गंधी घालवण्यास पुदिना उपयुक्त ठरतो. पुदिना तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो तसेच अस्थमा सर्दी असलेल्या रुग्णांमध्ये पुदिन्याचा केवळ वास घेतल्यामुळे देखील आराम पडतो. असा हा गुणकारी पुदिना प्रत्येकाने आहारात ठेवला पाहिजे.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक,ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ,कोल्हापूर .
7499891805
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.