कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेच्यावतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम होऊ न शकल्याने २०१९ चे बालसाहित्य पुरस्कार तसेच २०२० चे बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली आहे. यावेळी उपाध्यक्ष बाळ पोतदार व कार्यवाह मिलिंद कोपार्डेकर हे उपस्थित होते.
कोरोना कालावधी आटोक्यात आल्यानंतर लगेचच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल असे पुरस्कार संयोजन समितीच्यावतीने सांगण्यात आले.
उत्कृष्ट बालसाहित्य 2019 चे पुरस्कार असे –
चरित्र – तुकाराम नावाचा संत माणूस – विश्वास सुतार ( कोल्हापूर)
बालकथा – मैत्री – वर्षा चौगुले (सांगली )
बालकविता – जग नवलाई – प्रा. देवबा पाटील (खामगाव, जि. बुलढाणा )
बालकविता – स्वप्नवेड्या पंखासाठी – किरण भावसार (नाशिक)
बालकविता – इंद्रधनु – रमेश तांबे (मुंबई )
बालकादंबरी – वारूळ – संजय ऐलवाड (पुणे)
बालएकांकिका – धमाल एकांकिका – संयुक्ता कुलकर्णी (नाशिक)
बालकादंबरी – निचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग – नचिकेत मेकाले (नांदेड)
उत्कृष्ट बालसाहित्य २०२० चे पुरस्कार असे –
बालकविता – नदी हसली नदी रुसली – डॉ. सुरेश सावंत (नांदेड)
बालकविता – हडेलहप्पी जादूची झप्पी – वीरा राठोड ( औरंगाबाद)
बालकविता – बाग आम्हा मुलांची – मालती संमले (गडचिरोली)
बालकादंबरी – कांडा – सुनिताराजे पवार ( पुणे)
बालकथा – जंगलातील फेरफटका – माधुरी तळवलकर (पुणे)
समीक्षा – बालसाहित्य वाटा आणि वळणे – प्रा. रामदास केदार (देऊळवाडी, जि. लातूर)
समीक्षा – मुलांसाठी कविता (शालेय नाविण्यपूर्ण उपक्रम) – वीरभद्र मिरेवाड (नांदेड)
बालनाटीका – असेल दृष्टी तर सजेल सृष्टी – डॉ नंदकुमार डंबाळे ( जालना)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.