राज्यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील ?
लाडका लाडू
दिवाळीत लाडू खात नाही असा माणूस विरळच म्हणावा लागेल. लाडू हा विविध धान्याचा, डाळींचा वेगवेगळे पदार्थ घालून बनतो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात लाडू सापडला आहे. सुश्रुत आपल्या रुग्णांना लाडू मध्ये औषधे घालून खायला द्यायचे उल्लेख आहेत.
लाडू हा विविध डाळीपासून, अगणित प्रकारच्या धान्यापासून बनतो. सर्व धान्यात, डाळीत प्रथिने असतात .काही प्रमाणत कॅल्शियम, लोह असते. लाडू मध्ये ड्राय फ्रूट घातल्यास प्रथिनांचे प्रमाण वाढते. तसेच बी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. यातील केशर वेलची जायफळ यामुळे तो पचायला हलका होतो. डिंक तळून घातला तर अजून पौष्टिक होतो. शुध्द तूपातील असला तर त्याच्या कॅलरीज ही कमी होतात. लाडू हे सर्वार्थाने पूर्णान्न आहे. कधी कानपूरला गेलात तर प्रसिद्ध ठगु के लड्डू नक्की खा!
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क, कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.