सांगली – देशिंग हरोली ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अग्रणी साहित्य प्रतिष्ठान मार्फत अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष कवी दयासागर बन्ने यांनी केले आहे. पुरस्काराचे हे २१ वे वर्ष आहे.
यंदा अग्रणी उत्कृष्ठ समग्र वाड्.मय पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ कथासंग्रह पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ युवा वाड्.मय पुरस्कार या चार प्रकारांमध्ये एक उत्कृष्ठ व एक विशेष असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एका साहित्यिकास अग्रणी साहित्य साधना पुरस्कार दिला जातो.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी १५ आॅगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकाच्या दोन प्रती , लेखकपरिचय व फोटोसह. ३० आॕगस्ट २०२३ पर्यंत पाठवावेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक , रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. पुरस्कारांचे वितरण नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या २१ व्या अग्रणी साहित्य संमेलनामध्ये दिले जाणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्कः दयासागर बन्ने ९९६०७२४२७७
पुस्तके पाठवण्याचा पत्ताः
कवयित्री सौ. मनीषा पाटील (कार्यवाह, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग हरोली)
मु.पोःदेशिंग-हरोली
ताः कवठेमहांकाळ
जिः सांगली
पिन कोडः४१६४१४
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.