October 16, 2024
Unseasonal weather will disappear Manikrao Khule forecast
Home » Privacy Policy » आता सामना दिवसाच्या उष्णतेशी व रात्रीच्या उकाड्याशी
काय चाललयं अवतीभवती

आता सामना दिवसाच्या उष्णतेशी व रात्रीच्या उकाड्याशी

आता सामना दिवसाच्या उष्णतेशी व रात्रीच्या उकाड्याशी

     अवकाळीची स्थिती –

मंगळवार ( ता.३० एप्रिलपासून)  संपूर्ण महाराष्ट्रात विजा, वादळी वारा, गारा व अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल.

     मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यातील रात्रीचा उकाडा –

  मात्र उद्या मंगळवार दि. ३० एप्रिलपासून  खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा सम्पूर्ण १० जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील सर्व नव्हे परंतु काही भागात, पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे दिवसाची उष्णतेबरोबर रात्रीच्या उकाड्यातही कमालीची वाढ होवून काहिली जाणवणार आहे. विशेषतः रात्रीचा उकाडा अधिक जाणवेल.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या पाच जिल्ह्यात ह्या उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. येत्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात ह्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीचीच शक्यता असुन जन-जीवनाला  ह्या असह्य उष्णता व उकाड्याशीच चांगलाच सामना करावा लागेल, असे वाटते.

विदर्भ –

विदर्भातील दोन्हीही तापमाने सध्या सरासरी इतकी असल्यामुळे तेथे सर्व सामान्य उष्णता जाणवेल.

कोकणातील उष्णतेची लाट –

मुंबई शहर तसेच उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या ७ जिल्ह्यात सध्या चालु असलेल्या उष्णतेच्या लाटेचा तसेच रात्रीच्या उकाड्याचा प्रभाव कायम असुन तेथील जनजीवनाला येत्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यातही ह्या असह्य काहिलीचा सामना करावा लागेल, असे वाटते.

कश्यामुळे उष्णतेचे वातावरण टिकून असणार आहे?

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात हंगामी प्रत्यावर्ती वाऱ्यामुळे वायव्येकडून येणारी उष्णता व तयार झालेला हवेचा उच्चं दाब आणि त्यातून स्थिरावलेले वेगवान वारा (वहन) ह्यामुळे कोकणात उष्णतेची लाट टिकून आहे.
मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणालीतून तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा द्रोणीय आस व त्यामुळे शांत वारा व वाढलेले पहाटेचे किमान तापमानामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ झालेली आहे.

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading