एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी अशी आहे.
सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या एक पणती उजेडासाठी ग्रंथाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते मुंबई येथे झाले. एक पणती उजेडासाठी हा ग्रंथ डाॅ प्रतिमा इंगोले यांचे मातामह (आईचे वडील) कै.श्यामराव कुकाजी ढाकरे यांच्यावर आहे. ते स्वातंत्र्य सैनिक तसेच आदर्शशिक्षक होते. त्यांचेवरील अनेक मान्यवरांचे लेख असलेला हा ग्रंथ सर्वांनी संग्रही ठेवावा असा आहे. ह्या ग्रंथाला स्व.ग. प्र. प्रधान यांची प्रस्तावना आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिक समितीचे अध्यक्ष अच्युतराव देशपांडे व त्यांच्या चळवळीतील बलिदानाला परिचीत असणारे एकनाथराव तिडके यांचा तसेच जिथे हा स्वातंत्र्य लढा झाला तेथील तुळशीदास खिरोडकर यांचा व डाॅ प्रतिमा इंगोले यांचा तिरंग्याच्या रंगासाठी हा लेख आहे.
स्व. बापूसाहेब लोकप्रिय नेते होते. माजी मंत्री सरनाईक, वामनराव कोपरे, विरघट याचे लेख आहेत. बापूसाहेब यांना कवी म्हणून जाणणाऱ्या साहित्यिकांपैकी राम शेवाळकर, विठ्ठल वाघ, अरूण साधू, शंकर वैद्य, केशव बोबडे, केशव मिश्रा, पुरषोत्तम बोरकर, डाॅ. वि. भि. कोलते, डाॅ. सुशीला पाटील यांचे लेख आहेत. तर काही शिक्षक व काही विद्यार्थी काही गावकरी यांचे लेख आहेत.
एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी असे मत मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. यावेळी दुरदर्शनचे प्रतिनिधी कमलाकर जगताप हे उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.