October 4, 2023
Home » सवयी बदला भविष्य बदलेल
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

सवयी बदला भविष्य बदलेल

कोणत्याही आव्हानात्मक क्षेत्रात मिळालेले यश हा काही योगायोग नसतो. माणसाच्या या धवल यशात त्याच्या चांगल्या सवयींचा ही सिंहाचा वाटा असतो. लहानपणापासुनच जडलेली अभ्यासाची,वेळेच्या नियोजनाची, व अपार कष्ट करण्याची सवय एखाद्याला जन्मभर पुरेल इतके देते . माणुस हा सवयींचा गुलाम असेलही पण अपयशाचीही गुलामगिरी संपवण्याचे सामर्थ्य चांगल्या सवयीत असते.

रविंद्र खैरे, R.S.KHAIRE@GMAIL.COM

वर्षानुवर्षे स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करुनही एखाद्याला जे मिळवता येत नाही ते या क्षेत्रात अगदी नवखा असलेला एक तरुण सहज मिळवतो. मग बरेचजन याला योगायोग, किंवा नशीब असे म्हणतात. पण त्याचा बारकाइने अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल त्या तरुणाकडे असणार्‍या काही चांगल्या सवयीमुळे त्याच्या पदरात हे भरभरुन दान पडलेले असते. लहानपणी पासुन आइ- वडीलांनी केलेले संस्कार आणि कळत्या वयात आपणच स्वतःला लावलेली सवय अशी मोक्याच्या क्षणी कामला येते. कारण स्पर्धापरीक्षेचा अभ्यास हा काही चाचणी परीक्षेचा अभ्यास नव्हे एका दिवसात संपायला, स्पर्धापरीक्षेसाठी घ्यावे लागणारे कष्ट हे नीरंतर आणि सतत घ्यावे लागतात. उसणे अवसान फक्त एक दोन दिवस किल्ला लढवु शकेल पण जेव्हा एखादे काम दररोज करायचे असते तेव्हा आपल्या चांगल्या सवयी उपयोगाला येतात. याच सवयीमुळे आपण आव्हानांचा प्रचंड मोठा डोंगर लिलया पार करु शकतो. म्हणुनच ज्यांना स्पर्धा करायची आहे अशा तरुणांनी आपल्या ध्येयासाठी गरजेच्या असलेल्या काही चांगल्या सवयी अंगी बानवल्यास नक्कीच चांगला परीणाम होइल.

चांगल्या सवयीः

सगळ्याच सवयी वाइट असतात असा समाजतील काहींचा समज असतो पण आज घडीला कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धेसाठी तयार होणारी व्यक्ती त्या क्षेत्रात टिकण्यासाठी ज्या सवयी गरजेच्या असतात त्या स्वतःच्या अंगी बानवते. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे. सकाळी लवकर उठणे. तळमळीने काम करणे, जनसंपर्क वाढवणे, प्रचंड कष्ट करणे, दररोज नवे टार्गेट घेणे ते वेळेत पुर्ण करणे अशा अनेक सवयी व्यवहारी जगात कळत न कळत आत्मसात कराव्याच लागतात. त्या शिवाय स्पर्धेत स्वतःचा निभाव लागणे कठीण असते. म्हणुन आजकाल कार्पेरेट क्षेत्रात अशा सवयी बाबत विवीध कार्यशाळा घेतल्या जातात सवयी कशा लावता येतील वाइट सवयी कशा सोडवल्या जातात याबाबत मार्गदर्शन केले जाते.

सवय कशी जडतेः

माणसाला कोणतीही सवय ही जन्मजात नसते. त्याच्या आजुबाजुची परीस्थीती, मनावर बिंबवले जाणारे विचार अशा अनेक गोष्टीचा परीणाम होउन सतत आपण एकसारखी कृती करीत राहील्यास आपल्याला सवय लागते. या सवयीमुळेच आपले आयुष्य घडते किंवा बीघडते. ज्यांना भविष्य घडवायचे आहे त्यांनी स्वतःच्या सवयीचा बारीक अभ्यास करणे व योग्य सवयी लावुन घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा कोणतीही चांगली अथवा वाइट सवय 21 दिवसाच्या पर्यत्नानंतर सोडवता येते अथवा जडते सुध्दा मग आपण कोणत्याही वयाचे असाल आपल्या मनाचा निग्रह असेल तर नक्कीच काही चांगल्या सवयी आपल्याला लागु शकतात.

काय करु शकता?

स्वतःच्या सवयींचा अभ्यास करावा आपल्या चांगल्या अथवा वाइट सवयी प्रामाणीकपणे कागदावर लिहुन काढाव्यात.

यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे कोणत्या सवयी आवश्यक आहेत त्याची एक यादी करावी व या सवयीचे महत्व मनाला पटवुन सांगावे,

सुरुवातीला सवय बदलताना त्रास होतोच पण चांगल्या भविष्यासाठी असे त्रास सहन करण्याची मानसीकता हवी

ज्या व्यक्ती यशस्वी आहेत त्यांनाही या सवयी लावुन घेताना प्रंचड त्रास झालच होता. पण त्यांनी जाणीव पुर्वक,निग्रहाने त्या सवयी अंगीकारल्या आज त्यांना मिळणारा पैसा, प्रतिष्ठा ही त्यांनी सहन केलेल्या त्रासाचा मोबदला आहे.

आपण मनाचा निग्रह करुन चांगली गोष्ट सतत करीत राहीलो की नक्की आपल्याला त्याची सवय होइल

अशा सवयीच नंतर आपल्या मार्गातील अडथळे दुर करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या तरुणानी सवयी आत्मसात करण्याचे कौशल्य शिकले तर अभ्यासात आणि मुलाखती दरम्यान या सवयी आपल्याला भरपुर मदत मिळवुन देतील यात शंकाच नाही.

माैनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरू वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.freewebs.com/mounimaharaj/

Related posts

विचार नेमक्या, नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत सांगणारं पुस्तक

दिशा बांधकाम नवनिर्मितीची…

मिसेस अचीव्हर सुजाता रणसिंग चालवतात शाळा !

Leave a Comment