सह्याद्री आणि पाऊसाचं हे नातं काही वेगळचं आहे. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम घाटाचे सौंदर्य काही औरच असते. घाटमाथ्यावर टेकलेल्या ढगातून जाताना स्वर्गात गेल्याचा भास होतो. मनाला मोहून टाकणारे हे सौंदर्य, हिरवाईने नटलेला परिसर, या डोंगरदऱ्यातून वाहणारी नदी-नाले कोसळणारे धबधबे मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातात. असेच काहीसे सौंदर्य अनुस्कुरा घाटात पाहायला मिळते. कोल्हापूरहून राजापूरला जाताना अनुस्कुरा घाट लागतो. या घाटातील नागमोडी वळणे आणि पावसाळ्यात टेकलेले ढग यातून जाताना वेगळाच आनंद मिळतो. ड्रोनच्या सहाय्याने टिपलेले हे सौंदर्य आपणासाठी डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने

Home » अनुस्कुरा घाटात ढगांची सफर ड्रोनच्या नजरेतून…( व्हिडिओ)
previous post