गोफणगुंडा
कुणी तिकीट देता का तिकीट
फुटक्या गळक्या माठाला
पाणी गुडूप करणार्या घटाला
डेरेदार पोटाला
तिकीट देता का तिकीट
फुटक्या गळक्या माठाला
दुधसंघाचं चालेल
जिल्हाबॅंकेचं चालेल.
ग्रामपंचायतीचं काय
झेडपीचंही चालेल
विदेशात खोटं बोलण्यासाठी
लोकशाहीची जिरवण्यासाठी
विधानसभेत बाकं वाजवण्यासाठी
संसदेत मुकं होण्यासाठी….
करेक्ट कार्यक्रम करेक्ट स्क्रिप्ट
तिकीट देता का तिकीट
फुटक्या गळक्या माठाला
तिकीट देता का तिकीट
भागली नाही तहान
मिळाला नाही मान.
पाणी साठवायचं
उरलं नाही भाण…
पाणी ढोसून ढोसून
माठाला गेले तडे.
पिणारे सारे मुके मुके
पजणारे झाले तगडे….
काठावरती बसुन धर्माला आणली झीट
तिकीट देता का तिकीट
फुटक्या गळक्या माठाला
तिकीट देता का तिकीट
मी शोधतोय
तिकीटाचे ठेकेदार
पक्षाचे कदरदार
मतदारांचे वफादार
टाळूवरचे लोणीखाणारे
दिलदार उमेदवार
भारतचा नकाशा
उध्वस्त करणारे पहारेदार
हे सारे सापडले की मोहिम हिट
तिकीट देता का तिकीट
फुटक्या गळक्या माठाला
कुणी तिकीट देता का तिकीट
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.