रविवारी ( दि.१९ मे) अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट व्हावयाचे आहे.
माणिकराव खुळे
उष्णतेच्या लाटेची शक्यता ‘
संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक म्हणजे ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहून आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार ( दि २५ मे) पर्यन्त उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते, असे वाटते.
दरम्यानच्या पाच दिवसात गुजराथत व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल.विशेषतःह्या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे, पालखेड येथे अधिक जाणवेल, असे वाटते.
वादळी पावसाची शक्यता कायमच-
उष्णतेची लाट सदृश्य स्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार ( दि.२५ मे )पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असुन गुरुवार, शुक्रवार, (दि.२३ व २४ मे )असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ह्या ८ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता अधिक जाणवेल.
मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात मात्र शुक्रवार (दि.२४ मे ) पासून ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे मात्र २४ मे नंतरही वातावरण टिकून राहील.
मान्सूनचा वेग कायम तर चक्रीवादळही डोकावतेय!
रविवारी ( दि.१९ मे) अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट व्हावयाचे आहे.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.