March 19, 2024
Heavy Sound Pollution In Moradabad Utter Pradesh UNEP Report
Home » उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदुषण
काय चाललयं अवतीभवती

उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदुषण

  • सर्वाधिक ध्वनी प्रदुषणात दक्षिण आशियामधील 13 शहरांचा समावेश.
  • यामध्ये भारतातील पाच शहरांचाही समावेश.
  • सयुक्त राष्ट्र पर्यावरण अभियानाच्या अहवालात 61 ध्वनी प्रदुषित शहरांचा उल्लेख.
  • बांगला देशाची राजधानी ढाक्यामध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदुषण

संयुक्त राष्ट्र पर्यावरण प्रोग्रॅम ( युएनईपी ) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पितळेची नगरी म्हणून प्रसिद्ध असणारे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहर ध्वनी प्रदुषणात दक्षिण आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुरादाबादमध्ये सर्वाधिक 114 डेसिबल (डीबी) ध्वनी प्रदुषणाची नोंद केली आहे. अहवालामध्ये एकूण 61 ध्वनी प्रदुषित शहरांचा उल्लेख आहे. त्यामध्ये सर्वाधिक 119 डीबी इतके ध्वनी प्रदुषण बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये नोंदविण्यात आले आहे. तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ध्वनी प्रदुषणात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे 105 डीबी ध्वनी प्रदुषणाची नोंद झाली आहे.

युएनईपीच्या फ्रंटियर 2022 च्या अहवालानुसार ध्वनी प्रदुषण ही एक नवी आपत्ती मानली जात आहे. भारतात मुरादाबादासह जयपूर, कोलकत्ता, आसनसोल, दिल्ली येथेही सर्वाधिक ध्वनी प्रदुषण होत असल्याची नोंद अहवालात केली गेली आहे. दिल्लीमध्ये 83, जयपूरमध्ये 84, कोलकत्ता आणि आसनसोलमध्ये प्रत्येकी 89 डेबिसल ध्वनी प्रदुषणाची नोंद केली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 70 डीबीपेक्षा अधिक ध्वनी प्रदुषण आरोग्यासाठी हानिकारक असते.

दक्षिण आशियामध्ये झालेल्या पाहाणीमध्ये रहदारी आणि वाहनांपासून होणारे ध्वनी प्रदुषण सर्वाधिक अधिक असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लुएचओ) ने 1999 मध्ये वसाहतीच्या क्षेत्रात 55 डीबी तर रहदारीच्या तसेच व्यावसाहिक क्षेत्रात 70 डीबीचे प्रमाण निश्चित केले आहे.

डब्लुएचओने 2018 मध्ये आरोग्य सुरक्षेचा विचार करून रस्त्यावरील ध्वनी प्रदुषणाची सीमा 53 डीबी निश्चित केली आहे. भारतातील शहरीभागात 55 डीबी इतकी ध्वनी सीमा निश्चित केली आहे. त्यापेक्षा अधिक डीबी असल्यास त्याची नोंद ध्वनी प्रदुषण शहरामध्ये करण्यात येते.

शहरांचा वाढता विस्तार ध्वनी प्रदुषणवाढीस कारणीभूत ठरत आहे. पर्यावरणासाठी हा मोठा धोका समजला जात आहे. ध्वनी प्रदुषणामुळे झोपेवर परिणाम होतो. यामुळे मानवाचे आरोग्य आणि स्वास्थ यावरही प्रतिकुल परिणाम होतो. या प्रदुषित भागात आढळणाऱ्या जनावरांमध्येही ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इंगर एंडरसन

कार्यकारी संचालक, युएनईपी

अहवाल काय सांगतो ?

अहवालानुसार बराच कालावधीपर्यंत मोठ्या प्रमाणात होत असलेले ध्वनी प्रदुषण हा चिंतेचा विषय झाला आहे. युरोपियन युनियनमध्ये कमीत कमी 20 टक्के नागरिक हे ध्वनी प्रदुषणाच्या समस्येने बेजार आहेत. नियमितपणे दिवसातील आठ तास 85 डेसिमल आवाजाच्या संपर्कात राहील्यास ऐकण्याच्या क्षमतेवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. इतकेच नव्हे तर शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो असे हा अहवाल सांगतो.

ध्वनी प्रदुषणामुळे दरवर्षी युरोपमध्ये हृदय रोगाचे सुमारे 48 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2.2 कोटी नागरिकामध्ये चिडचिडेपणाचा त्रास दिसून आला आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. कॅनडामधील टोरंटोमध्ये 15 वर्षे ध्वनी प्रदुषणावर अभ्यास करण्यात आला. यामध्ये आवाजामुळे 8 टक्के नागरिकांमध्ये हृदयविकाराचा धक्का, हृदय बंद पडणे, मधुमेह या सारखे आजार वाढल्याचे दिसून आले आहे. तर दोन टक्के नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे विकार आढळले आहेत.

कोरियामध्ये झालेल्या अभ्यासात हृदय आणि मेंदुच्या रक्त पुरवठ्याशी संबंधीत विकारात 0.17 ते 0.66 टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. अन्य प्रदुषणाप्रमाणेच ध्वनी प्रदुषणही कमी करता येणे शक्य आहे. त्यावरही उपाय योजना होऊ शकतात. काही देशांनी या संदर्भात कायदे सुद्धा केले आहेत. पण त्याची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.

Related posts

गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

भेंडीवरील विषाणुजन्य हळद्या रोगाचे व्यवस्थापन

पिकानुसार करा जैविक खतांची बीजप्रक्रीया

Leave a Comment