October 6, 2024
Chitte River renovation Project article by Narhari Shivapure
Home » Privacy Policy » चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल

महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. जाणून घेऊया या अभियानाबद्दल…

  • २७ गावे झाली टँकरमुक्त
  • लोकसहभागातून उभारली लोकचळवळ
  • नदीचे झाले पुनरूज्जीवन

वसुंधरा ( IWMP – 17, Aurangabad ) पंतप्रधान कृषि सिंचन योजनेच्या (PMKSY) सहकार्याने, ग्रामविकास संस्था – जलयुक्त शिवार अभियान, सकाळ रिलीफ फंड – सीएसआर – लोकसहभागातुन चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान राबविण्यात आले. शासकीय योजनेस लोकचळवळ बनविल्यास वाळवंटीकरणास सुरूवात झालेल्या चित्ते नदी खोऱ्याचे कसे नंदनवन झाले, हे चित्ते नदी खोरे पाहिल्यानंतर लक्षात येईल. औरंगाबाद शहराच्या दक्षिणेला 12 कि.मी अंतरावरील चित्ते नदी खोऱ्यात भुरचनेचा शास्त्रोक्त अभ्यास करून माथा ते पायथा असे जलव्यवस्थापन व शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल उभे राहिले आहे. महाराष्ट्रात जलव्यवस्थापनाचे व शाश्वत ग्रामविकासाची काही आदर्श मॉडेल उभी आहेत. परंतु एका गावाला केंद्रस्थानी मानून ही सर्व कामे झालेली आहेत. चित्ते नदी प्रनरूज्जीवन अभियान याला अपवाद आहे. 27 प्रमुख गावांचा समावेष असलेले चित्ते नदी खोरे केद्रस्थानी ठेवुन हे अभियान राबविण्यात आले आहे. चित्ते नदी खोऱ्याच्या सर्वागीन व शाश्वत विकासाकरीता खऱ्या अर्थाने लोकाभिमुख लोकचळवळ उभारण्यात आलेली आहे.

सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही एवढे मोठे नुकसान झाले. ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातुन गेल्या दोन दशकात मराठवाड्यात दुष्काळ निवारणाचे विविध प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. दुष्काळ कायमचा संपवायचा असल्यास एका गावाचा विचार न करता एका नदी खोऱ्याचा किंवा कल्सटरचा विचार झाला पाहीजे. हे सर्व विविध प्रयोगाअंती कळत होते. परंतु पर्याय नव्हता. औरंगाबादच्या दक्षिणेला 12 कि.मी. अंतरावर असलेल्या चित्ते नदी खोऱ्यात वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातुन 2012 साली ही संधी चालुन आली. या संधीचे सोने करायचेच या इराद्याने आजतागायत एखाद्या मृतप्राय नदीला पुनरूज्जीवन करायचे या सुप्त ईच्छाशक्तीला अंकुर फुटले. चित्ते नदी खोऱ्याच्या सर्वागीन विकासाकरीता वसुंधरा प्रकल्पाचा अपुरा असलेला निधी यावर मात करण्यासाठी, जलयुक्त शिवार अभियान, सकाळ रिलीफ फंड, केअरींग फ्रेंड्स मुंबई यांची मोलाची साथ लाभली. यामुळे अशक्य काम शक्य झाले.

पार्श्वभुमी:-

औरंगाबादच्या दक्षिणेला 12 कि.मी. अंतरावरील चित्ते खोऱ्यात नैसर्गीक साधन – संपत्तीची विपुलता होती. चित्ते नदी दुथडी भरून वहात असल्यामुळे पिण्यासाठी, पशुधनासाठी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होती. खोऱ्यातील माथ्यावरील गावातील उपजिवीका लाकडाच्या मोळया व गवताचे भारे विकुन भागवली जायची. दुध दुपते, वनराई विपुल असल्यामुळे लोक सुखी व समाधानी होते. औरंगाबाद शहराची बाजारपेठ जवळ असल्यामुळे खोऱ्यात एकुनच सुबत्ता होती.

कालातराने झालेली वृक्षतोड, जलव्यवस्थापनाकडे झालेले दुर्लक्ष्य, संघटीतपणाचा अभाव यामुळे दुष्काळ नित्याचाच झाला. औरंगाबाद शहराच्या जवळ असुनही रस्त्याची दयनीय अवस्था, स्थानीक रोजगार व मुलभुत सुविधाचा अभाव यामुळे स्थलातंर वाढले. 2012 च्या दुष्काळामुळे तर या खोऱ्यातील जनतेचे अतोनात हाल झाले. चाऱ्याअभावी पशुधन विकावे लागले. फळबागा तोडाव्या लागल्या. महिलांना घागरभर पाण्यासाठी टॅकरची वाट पहात रात्र, रात्र, जागुन काढावी लागली. एकुणच परिस्थिती हाताबाहेर गेली व कधीही भरून निघणार नाही एवढे मोठे नुकसान झाले.

चित्ते खोऱ्याचा परिसर –

चित्ते नदी औरंगाबादच्या दक्षिणेला 12 कि. मी. अंतरावर असुन, या खोऱ्याचे क्षेत्रफळ 6427 हेक्टर आहे. माथ्यावरील सिंदोन भिंदोन ते पायथ्याकडील एकोड, पाचोड, चित्तेगाव अशा प्रमुख 12 गावांचा या खोऱ्यात समावेश आहे. यात 19 लघु पाणलोटाचा समावेश असुन 15,000 लोकसंख्येची उपजिवीका या भागातुन वाहणाऱ्या चित्ते नदीवर अवलंबुन आहे. चित्ते नदी या भागातून साधारणतः 17 कि.मी. पर्यत वाहत जावून सुखना धरणांत विसर्जीत होते. या भागात जमिनीचा उतार तीव्र असुन प्रकार मध्यम आहे. भुस्तरामध्ये काळा पाषाण, मांजऱ्या खडक, गेरू (रेड बोल) यांचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासुन माथा उंची 793 मी. तर पायथा उंची 537 मी. आहे. खरीप पिकामध्ये बाजरी, मका, कापुस तर रब्बीमध्ये ज्वारी, गहु, कांदा, तर उन्हाळ्यामध्ये मोसंबी, डाळींब, भाजीपाला ही पिके घेतली जातात. वन व पडिक जमीनीचे क्षेत्र मोठे आहे.

अशी झाली सुरूवात:-

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाच्या माध्यमातुन लोकाभिमुख जलचळवळ उभी करून चित्ते नदी खोऱ्याचा सर्वागीन विकास साधण्याकरिता 6 फेब्रुवारी 2015 रोजी स्वामी विवेकानंद विद्यालय चित्तेपिंपळगाव येथे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली चित्ते खोऱ्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, व ग्रामस्थ याची बैठक झाला. या बैठकीत दहा कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यामध्ये माथा ते पायथा उपचार व शाश्वत ग्रामविकास याचा अंतर्भाव होता. प्रथम टप्यात ग्रामसभा, समाजप्रबोधन, क्षमताबांधणी प्रशिक्षण, हिवरे बाजार यथे ग्रामस्थांची सहल व गाव तेथे प्राधान्यक्रमाने लोकांच्या प्रमुख गरजेवर आधारीत स्वागतशिल उपक्रम Entry Point Activity (EPA) मधून कॉक्रीट रोड, सोलार लाईट, जनरेटर या मुलभुत कामाबरोबरच जलव्यवस्थापनासाठी कंपार्टमेंट बंडीग, डिप.सी.सी.टी. शेततळे ही काम केल्यामुळे झपाट्याने भूजल पातळी वाढली. खऱ्या अर्थाने चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानास सुरूवात झाली.

आजतागायत माथा ते पायथा चित्ते नदी खोऱ्यात झालेली जलव्यवस्थापनाची कामे

उपजिविका:-

उपजिविका हे वसुंधरा- पंतप्रधान कृषि सिंचन योजनेचा प्रमुख व महत्वाचा घटक आहे. उपजिवीकेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी पहिल्यादांच आर्थिक मदत देण्यात आली. वसुंधरा प्रकल्पांतर्गत 101 महिला बचत गटाना, 68 भुमीहिनाना व 624 शेतकऱ्यांना 9465000/- रूपये आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये लाभार्थ्यांनी स्वताचे 9465000/- रूपये सहभाग देवून असे एकुण 18930000/- रूपयांची स्वयंरोजगारासाठी गुतवणुक झाली. यामुळे 1010 महिलांना 64 भुमीहीनाना रोजगार मिळाला व 624 शेतकरी कुटूंबाचे उत्पन्न दीड ते दुपटीने वाढले.

दृष्यपरिणाम:-

चित्ते नदी खोऱ्यातील भुगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून माथा ते पायथा या तत्वानुसार कामे झाल्यामुळे जलसमृद्धी उपलब्ध झाली आहे.

  • पूर व मातिचे धूप नियंत्रण.
  • भूजलपातळीत 3 ते 4 मी. ने वाढ.
  • सरंक्षीत सिंचन क्षेत्र 2308 हे.
  • बारमाही सिंचन क्षेत्र 1220 हे.
  • दुध उत्पादनात 46950 लिटरने वाढ.
  • भाजीपाला, व फळबागा क्षेत्रात वाढ आणि पीक पद्धतीत बदल.
  • पाण्याचा कार्यक्षम वापराकरीता ठिंबकचा वापर .
  • बारा गावे टॅकरमुक्त.
  • स्थलातर थांबून भुमीहीनाना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध
  • प्रती हेक्टरी उत्पादनात दुपटीने वाढ.
  • नगदी पीक क्षेत्रात अमुलाग्र बदल.


विशेष:-

  • लोकसहभागातुन रूपये 2 कोटी 40 लाख रूपयाची कामे पुर्ण.
  • 17 कि.मी. चित्ते नदीवर 25 साखळी बंधाऱ्याची उभारणी.
  • बारमाही सिंचनाकरीता 100 टक्के सुक्षम सिंचन.
  • थेट शेतमाल विक्रीकरीता शालिवाहन ग्रामविकास शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना.
  • पाण्याच्या ताळेबंदामुळे पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर.
  • कृषीपुरक व्यवसायात वाढ.
  • चित्ते नदी खोऱ्याचा एकात्मिक व शाश्वत विकास .
  • खंडीत झालेली चित्ते नदी पुन्हा प्रवाहीत.
  • चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – एक शोधयात्रा पुस्तकाची निर्मीती.
  • महिलांचा संक्रीय सहभाग, बचत गटाना खेळते भांडवलाकरीता 1.50 कोटीचे वितरण
  • पर्यावरण संरक्षणाकरीता स्वईच्छेने 300 जलमित्र कार्यरत
  • शेतात गाळ टाकल्यामुळे रासायनीक खताची प्रति वर्ष 8 लाखाने बचत.

लोकसहभागातून विकास अभियान:-

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानात लोकसहभाग ही सर्वात जमेची बाजु आहे. 29 पैकी 12 पाझर तलावातील गाळ काढणे, 15 कि.मी. नदीचे रूंदीकरण व खोलीकरण ही दीड कोटीचे कामे लोकसहभागातुन झालेली आहेत. यामध्ये सकाळ रिलीफ फंड, कअे रींग फें्रडस मुंबई, जलयुक्त शिवार अभियान, देवगीरी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचा एक दिवसाचा पगार, तनिष्का सदस्य, गोसवर्धन सहकारी दुध व्यावसाईक संस्था चित्तेपिंपळगाव, महामार्गाचे काम करीत असलेली वाय. पी.देशमुख कंपनी, सिंदोन यथील जलमित्रांनी होळीसाठी पळसाच्या फुलापासुन नैसर्गीक रंग तयार करून विक्रीतुन उभारलेला निधी व गाळ – मुरूम वाहुन नेणारे ग्रामस्थ यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading