February 21, 2025
I Will Win Pushpa Varkhekar article
Home » मी विजेता होणारच !!
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मी विजेता होणारच !!

आपलं एक निश्चित क्षेत्र निवडावे व त्या दिशेने पाऊल उचलून मार्गक्रमण करीत राहावे. तुम्हाला काही अडथळे निर्माण झाले तर तुमचे गुरुजन, पालक, मित्र व तुमचा आत्मविश्वास तुम्हाला साह्य करेल. हे करीत असताना आपल्या मार्गात येणारी शत्रू म्हणजे आजच काम उद्या करू. आपला वर्गमित्र चारित्र्यवान असावा.

सौ पुष्पा सुनीलराव वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा वरूड

विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षेचा कालावधी सुरू झाला आहे. फेब्रुवारी ते साधारणतः मे जून पर्यंत या कालावधीत प्राथमिक परीक्षेपासून ते पदवीपर्यंत निरनिराळ्या परीक्षांचा हा कालावधी यामध्ये वर्षभराचे संपादन केलेले ज्ञान, कला, साहित्य इत्यादींचे मूल्यमापन केल्या जाते. साधारणतः शिक्षणाचा कालावधी जून पासून सुरू होतो. प्रवेश परीक्षेपासून सुरुवात होते.

प्रवेश मिळविण्याकरिता सुद्धा परीक्षा घेतली जाते. आज शिक्षणाचा वाढलेला पसारा पाहता खरोखरच शिक्षणाचे ओझे विद्यार्थ्यांच्या बुद्धी आणि शक्तीच्या बाहेर आहे. इथे पालकापासून ते बालकापर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. या समस्यांना तोंड देण्याकरता परिश्रमाशिवाय ते प्राप्त होणे अशक्य आहे.

वास्तविक कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार आपण प्रयत्नाच्या पराकाष्टेने यश संपादन करू शकतो. जी गोष्ट आपल्याला सिद्ध करून घ्यावयाची आहे त्यासाठी आपण अध्ययन केलेल्या अर्जित ज्ञानाची प्रक्रिया अवलंबिली पाहिजे. ती म्हणजे चिंतन मनन व निधी ध्यासन. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे संपादन करायचे आहे त्यासाठी आळस झटकून टाकावा.
God help them who help themselves “
प्रयत्नांती परमेश्वर”

पहिली गोष्ट म्हणजे ध्येय निश्चित करणे. ध्येय निश्चित कालावधीमध्ये साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे व स्वप्नाचे अंतिम फळ होय. जेव्हा ध्येय ठरविल्या जाते तेव्हाच मनाला सांगा की मी”विजेता होणारच”म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की नकारात्मक विचार निघून जाईल मला हे जमणार नाही हे मी करू शकत नाही हे मनात येऊ देऊ नका.

तुकाराम महाराज म्हणतात.
असाध्य ते साध्य करिता सायास!
कारण अभ्यास तुका म्हणे!
तुमच्या ध्येयाला कृती, निश्चितता, दीर्घ प्रयत्न याची जोड द्या. ध्येयापासून परावृत्त होण्याचा विचारही करू नका. मेहनत केल्यानंतर सफलता मिळते. सफलता प्राप्त झाल्यावर आनंद मिळतो. दृढ आत्मविश्वास व अथक परिश्रमाच्या बळावर आगळावेगळा आदर्श निर्माण करता येतो. आधी मन प्रसन्न ठेवा व मन प्रसन्न ठेवण्याकरता आहार, विहार, विश्राम व सद्वीचार, सत्संगती हवी आहे.

मन करा रे प्रसन्न!
सर्व सिद्धी सी कारण!
काही प्रश्न दररोज स्वतःला विचारा
१) आज करावयाची कामे मी पूर्ण केलीत का?
२) मी आज शारीरिक व्यायाम केला आहे का?
३) वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केला आहे का?
४) मी आज नवीन कोणती गोष्ट शिकली आहे का ?
५) वर्ग शिक्षकाकडे शिकविताना लक्ष दिले का?
६) उद्याची तयारी आजच करून ठेवली आहे काय?
वरील गोष्टीचे मनन करून जीवन यशस्वी बनविता येते. म्हणजे ध्येय निश्चित करण्यासाठी वरील गोष्टीचे काटेकोरपणे पालन केल्याशिवाय ती गोष्ट प्राप्त होत नाही.

आमच्या लहानपणी आम्हाला कावळ्याची गोष्ट होती. त्या कावळ्याला तहान लागली होती. पाणी आसपास दिसेना परंतु एका भांड्यात बुडाशी थोडे पाणी होते. त्या कावळ्याला तहान लागली होती त्यामुळे कावळ्याने प्रयत्नपूर्वक पाणी मिळविण्याचा निश्चय केला. व त्याने एक एक दगड चोचेत आणून भांड्यात टाकला व पाणी वर आले . अशा तऱ्हेने कावळ्याने आपली तहान भागवली. पशुपक्षी जर आपलं ध्येय गाठतात तर आपल्याला सर्व सुख सोयी असणाऱ्या मानवाला काय कठीण आहे? आपल्याला शाळेत काही स्फूर्ती गीत आपण ऐकत होतो. त्यापासून बोध घ्या.

हम होंगे कामयाब! हम होंगे कामयाब एक दिन! मन मे है विश्वास! पुरा हाय विश्वास! हम होंगे कामयाब एक दिन! ही स्फूर्ती गीत आपल्याला यशाच्या शिखरावर नेण्याकरता सहाय्यक ठरतात.”सुगमा कडून संकिरणाकडे”म्हणजे सोपा भाग आपल्या लवकर लक्षात राहतो व आत्मविश्वास वाढतो व हळूहळू आपण कठीण भाग सुद्धा आत्मविश्वासामुळे आकलन करू शकतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास व्याकरण रचिता पाणीनी याला आत्मविश्वासाच्या जोरावर तो प्रसिद्ध व्याकरण रचिता म्हणून ओळखल्या जातो. सुधा चंद्रन हिने अपंगावर मात करून एक प्रसिद्ध नर्तिका बनली. हेलन केलर आंधळी, मुकी, बहिरी होती. तिने स्वतः आपल्या अपंगावर मात केली केली.

नेपोलियन हिल म्हणतो__मनुष्याचे मन जी कल्पना करत असते व विश्वास ठेवत असते ते मन साध्य करत असते.म्हणून ज्वलंत इच्छा मध्ये कष्ट करण्याची जिद्द हवी. जेवढे तुम्ही कष्ट कराल, तेवढे तुम्ही भाग्यशाली व्हाल. विजेता होण्यासाठी खालील पाच मूलभूत पायऱ्यांचा अवलंब करा.
१) तुमच्या स्वतःच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांमध्ये गुंतवणूक करा.
२) वाचन करताना अधोरेखित पद्धतीचा अवलंब करा.
३) भविष्यातील संदर्भाकरिता नोंदवही मध्ये टीप लिहिण्याची सवय करा.
४) तुमच्यासोबत नेहमी नोंदवही ठेवा.५) तुमचे एक कात्रण पुस्तक तयार करून विचार, कल्पना व यशोगाथा संग्रहित करून मार्गदर्शक पुस्तक म्हणून त्याचा वापर करा.

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्याबद्दलची मानसिकता आत्मसात करावी लागते त्याला सुवर्णसंधी म्हणतात. परिश्रमाने व साधनेने यश संपादन करता येते. समाजात जी लोक मोठी झालीत त्या सर्वांसाठी एक बात सारखीच असते ती म्हणजे प्रत्येकाकडे 24 तासाचा दिवस होता. त्यांनी निर्माण केलेली संधी हीच महत्त्वाची बाब होती.
“Time is money”!

मनाला वारंवार शिकवण द्या मला माझं ध्येय साध्य करायचं आहे.
पुस्तकाशी प्रेम करशील तर तू होणार ज्ञानी! पुस्तक आहे सत्य मार्ग! त्यालाच घे ध्यानी!
सकारार्थी प्रयत्नांना यश मिळते म्हणूनच”मी विजेता होणारच एवढं slogan लक्षात ठेव.
हळूहळू मी ढाळे! केतू केनी एक वेळे! मार्गाची ये बळे निश्चित ठा के!
आत्मविश्वास उराशी बाळगावा. म्हणून यश संपादन करण्याकरिता शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.
शिक्षण हे बालपणीचे वळण! तरुणपणीचा पाठीराखा व म्हातारपणीचा दिलासा होय !
या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा, शरीर श्रम, साधना व ध्येय निश्चित याशिवाय आपण आपलं अंतिम ध्येय गाठू शकणार नाही. हे सर्व शिक्षणाचे, संस्काराचे धडे देणारे एकमेव केंद्र म्हणजे शाळा इथूनच आपल्याला शिखर गाठायचं असतं.
विद्यालय हे मंदिर सुंदर! प्रयाग जणू हे प्रज्ञाचे !
ज्ञान दिवाळी शोभा उजळी प्रसन्न गृह हे विद्येचे! समता, ममता, त्याग , बंधुता,! सेवा गुण हे नित्य स्मरा! अमृतवाच्या जय जय कारा! ज्ञानधनाची कास धरा! लळे भारती ज्ञान आरती! उन्मेशाची अर्थ फुले!
अर्पित सजले विद्या मंदिर!
मांगल्याची ज्योत जळे!
विद्यालय हे संस्कार केंद्र, ज्ञान केंद्र आहे याची उपासना करून गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाची उपासना करावी व ते वारंवार मनन करावे.

आपलं एक निश्चित क्षेत्र निवडावे व त्या दिशेने पाऊल उचलून मार्गक्रमण करीत राहावे. तुम्हाला काही अडथळे निर्माण झाले तर तुमचे गुरुजन, पालक, मित्र व तुमचा आत्मविश्वास तुम्हाला साह्य करेल. हे करीत असताना आपल्या मार्गात येणारी शत्रू म्हणजे आजच काम उद्या करू. आपला वर्गमित्र चारित्र्यवान असावा. दुसरा शत्रू म्हणजे आज तंत्रज्ञान विकसित झालेला आहे. मोबाईल, टीव्ही यापासून दूर राहा. नाहीतर अपयश तुम्हाला मागे खेचून घेईल. म्हणून उद्याचे काम आपल्याला आजच करावयाचे आहे. व्यसनापासून दूर राहा.
कल करे सो आज करे! बहुरी करोगे कब!

हे सर्व संपादन करीत असता आपल्या अंगी नम्रता असावी. नाहीतर अहंकारा सारखा शत्रू नाही. आई वडील, गुरुजन, मित्र, नातेवाईक यांच्याशी आपली वागणूक नम्रतेची हवी. अहंकार, हा यशाच्या मार्गावरील शत्रू आहे. विद्याधना बरोबरच एक आदर्श मानवीय मूल्य जोपासा तरच ते यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवेल. तुमच्या आत्मविश्वासामुळे”मी विजेता होणारच”या तीन शब्दांनी अनेकांचे आयुष्य यशस्वीरित्या बदलून टाकले. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक दिवस तुम्हाला आलिंगन देण्यासाठी सुवर्णसंधी बनून आला आहे. त्याचे सहर्ष स्वागत करा व संधीचे सोने करा. पुन्हा एकदा निश्चय करा”मी विजेता होणारच”


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading