प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा. यंदाच्या वर्षी बालकुमार वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचे वतीने प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड्:मय पुरस्कार देण्यात येतात.
राज्यस्तरीय पुरस्कार अकरा हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ तर खानदेशस्तरीय पुरस्कार पाच हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन 2021 पासून हे पुरस्कार दिले जातात.
2021 साली कथा: मनोहर सोनवणे(पुणे), युवराज पवार , 2022 साली कविता: पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी(नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव) आणि 2023 साली कादंबरी: ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल) यांना वाड:मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले.
2024 साठी हे दोन्ही पुरस्कार बालकुमार वाङ्मय ( कथा, कादंबरी, कविता, नाट्य, इ.) ह्या वाङ्मय प्रकारासाठी दिले जाणार आहेत. तेव्हा ह्या दोन्ही वाङ्मय पुरस्कारासाठी १ जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित बालकुमार वाङ्मयातील सर्व प्रकारांतील दोन प्रतित लेखकाच्या फोटो, परिचयासह 31, जानेवारी 2023 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन प्राचार्य किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी ( मो.9421568427 ) यांनी केले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता – प्रा. डॉ. वासुदेव वाले, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा, तलाठी कॉलनी, पाचोरा जि. जळगाव -424201 मो. 9420788336
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.