सबीज समाधी कशास म्हणतात ?
सूत्र-४४ एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता
जेव्हा एखादे ध्येय सूक्ष्म असते आणि चित्त त्याच्या देश, काल आणि निमित्ताच्या (Time, Space and cause) विचाराने एकरूप झालेले असते, तेव्हा सविचार समापत्ती होते. (इथे कार्यकारणभाव लक्षात घेतला जातो.) जेव्हा एकाग्रता वाढलेली असते, तेव्हा चित्त हे देश, काल आणि निमित्त यांच्यापासून वेगळे होऊन त्या सूक्ष्म विषयांशी तदाकार होऊन ज्ञान करून घेते, तेव्हा निर्विचार समापत्ती होते.
समाधिपाद सूत्र-४६ या एव सबीज:समाधि:
सवितर्क आणि निर्वितर्क समापत्ती व सविचार आणि निर्विचार समापत्ती या चारही प्रकारांना सबीज समाधी असे म्हणतात. कारण, त्यात ज्ञानाच्या प्रक्रियेत कोणत्या ना कोणत्या वस्तूचा, विषयाचा आधार घ्यावाच लागतो.
समाधिपाद सूत्र-४७ निर्विचार वैशारद्ये अध्यात्मप्रसाद:
निर्विचार समाधीत प्रावीण्य मिळाले की, अध्यात्मामधली खरी आनंदप्राप्ती होते. बुद्धीमध्ये जी निर्मलता तयार होते, त्याला अध्यात्म – प्रसाद म्हणतात. त्या वेळी केवळ प्रकाशस्वरूपाचा अनुभव येत असतो.
लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड