September 24, 2023
Home » पाच वृत्ती कोणत्या आहेत ?
विश्वाचे आर्त

पाच वृत्ती कोणत्या आहेत ?

मनात विपर्यय आला की, प्रमाणाची आवश्यकता वाटत नाही. तिथे तर्क चालत नाही. गैरसमज पक्का होऊन बसतो. मनात तर्काचे कितीही विचार आले, तरी त्यांना मागे सारून गैरसमज पक्का होऊन बसतो. वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूंचा भास होऊ लागतो. याला विपर्यय म्हणतात. मित्राच्या ठिकाणी शत्रू दिसणे, धैर्याची जागा भीतीने घेणे, हे सारे विपर्ययामुळे होते.

लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड

समाधिपाद – सूत्र-५ वृत्तय: पञ्चतय: क्लिष्टा: अक्लिष्टा:.

वृत्ती एकूण पाच आहेत. त्यात क्लिष्ट (क्लेशदायक) आणि अक्लिष्ट (सुखदायक) असे दोन भेद आहेत. क्लिष्ट वृत्ती या कष्ट किंवा त्रास देणाऱ्या असतात. अज्ञान, राग आणि  अवैराग्याकडे नेणाऱ्या असतात. यामुळे  योगात बाधा येते.  अक्लिष्ट वृत्ती या व्यक्तीला ज्ञान, धर्म आणि वैराग्याकडे नेतात. या योगाभ्यासाला पूरक असतात.

अज्ञान, राग आणि आसक्ती या वृत्तींमुळे मन चिडचिडे, लोभी, संतापी आणि भोगांच्या अतिरेकाला बळी पडते. याउलट ज्ञान, धर्म आणि वैराग्यामुळे मन विवेकी, कर्तव्यतत्पर आणि सत्क्रियाशील होते. याचा परिणाम योगाभ्यास सुकर होण्यात होतो. म्हणून वृत्तींना ताब्यात ठेवायचे असते. 

समाधिपाद सूत्र – ६  प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय:

प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या त्या पाच वृत्ती होत.

प्रमाण

जे नेमके माहीत नसते, त्याबद्दल तर्क करत बसणे. समोरची माणसे आपल्याबद्दलच कुजबुजतात असे वाटते. कितीही प्रामाणिकपणाने वागले तरी दुसऱ्याबद्दल अविश्वास वाटते. आपणच तेवढे सचोटीने वागतो, इतर लोक फसवतात, अशा शंका कुशंका असल्यामुळे पुराव्यांची आवश्यकता वाटू लागते. सत्य परिस्थिती समजून घ्यायला हवी असेल तर त्याला पुराव्यांची गरज असते.

प्रत्यक्ष प्रमाण

जे डोळ्यांना दिसते तेच खरे मानणे. हे ज्ञान डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आणि मन या कर्मेंद्रियांच्या मदतीने घेतले जाते.(valid cognition).

अनुमान

प्रत्यक्ष दर्शनाच्या मदतीने, आधाराने अप्रत्यक्ष असणाऱ्या पदार्थाबद्दल माहिती मिळवणे, अंदाज बांधणे, तर्क करणे याला अनुमान प्रमाण म्हणतात. धूर दिसला की,अग्नी असल्याचे सिद्ध होते. आदळ – आपट सुरू झाली की, शांतता बिघडली असल्याचे कळते !

आगम प्रमाण

ज्याचा माणसाच्या मनाला आणि इंद्रियांना प्रत्यक्ष अनुभव येत नाही आणि जिथे अंदाजही चालत नाही, तिथे शास्त्रग्रंथ, वेदवचन, महापुरुषांचे उपदेशपर शब्द हेच प्रमाण मानून विश्वास ठेवावा लागतो त्याला आगम प्रमाण म्हणतात.

समाधीपाद – विपर्यय वृत्तीने काय होते ?

समाधिपाद –  सूत्र – ७ प्रत्यक्षानुमानागमा: प्रमाणानि.

प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम या तीन प्रकारच्या प्रमाणांचा (वृत्तींचा) आपण विचार केला. आता दुसरी वृत्ती विपर्यय याचा विचार करू.

प्रमाणाचा विचार करत असताना त्यात शंका, कुशंका, तर्क, कुतर्क आणि संशय या गोष्टींचा विचार केला.

तुमचा एखादा जिवाभावाचा मित्र अचानकपणे तुसड्यासारखा वागू लागतो. आपल्याकडून कोणतीही चूक झालेली नसताना आपल्याबरोबर आपला मित्र असा रुक्षपणे का वागू लागला, असा विचार तुम्हाला सतत सतावू लागतो. त्याच्या मनात काय चालू आहे याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही. तो वाईटच विचार करत असतो असे नाही; पण मनात विपर्यय वृत्ती आली की, तो असे वागू लागतो. आपल्यावर कुणीच प्रेम करत नाही. आई – वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत असे मुलांना वाटू लागते. आपले प्रेम कसे सिद्ध करावे असा आई – वडिलांना पेच पडतो.

मनात विपर्यय आला की, प्रमाणाची आवश्यकता वाटत नाही. तिथे तर्क चालत नाही. गैरसमज पक्का होऊन बसतो. मनात तर्काचे कितीही विचार आले, तरी त्यांना मागे सारून गैरसमज पक्का होऊन बसतो. वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूंचा भास होऊ लागतो. याला विपर्यय म्हणतात. मित्राच्या ठिकाणी शत्रू दिसणे, धैर्याची जागा भीतीने घेणे, हे सारे विपर्ययामुळे होते.

लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड

Related posts

शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव

कर्माच्या त्यागामागची भूमिका कोणती ?

स्वःच्या अनुभुतीतूनच आध्यात्मिक विकास

Leave a Comment