September 24, 2023
Home » साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे मसापचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे मसापचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२१ च्या विविध साहित्य पुरस्कारांसाठी, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या वर्षात, प्रथम प्रकाशित पुस्तकांच्या, प्रत्येकी दोन प्रती लेखक किंवा प्रकाशकांनी ५ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह बंडा जोशी यांनी केले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार असे –
नवोदित कविंच्या पहिल्या कवितासंग्रहास कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार देण्यात येणार आहे. समीक्षा ग्रंथासाठी कै. प्रा. रा. श्री. जोग पुरस्कार तर कवितासंग्रहास कवी कुसुमाग्रज पुरस्कार देण्यात येणार आहे. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक ग्रंथासाठी कै. शं. ना. जोशी पुरस्कार तर इतिहास विषयक ग्रंथासाठी कै. द. वा. पोतदार पुरस्कार देण्यात येणार आहे. ललित लेखसंग्रहाच्या पुस्तकासाठी कै. निर्मला मोने पुरस्कार देण्यात येईल. तरी पुरस्कारांसाठी पुस्तकांच्या दोन प्रति कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे – ४११०३०. या पत्त्यावर दि. ५ जानेवारी २०२० पर्यंत पाठवावेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली आहे.

Related posts

संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहण्याची संधी…

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा

Leave a Comment