इथे कविता मन व जगताना येणारे अडथळे व जगात होणारा मनाचा कोंडमारा असे अनेक पैलू स्पष्ट करत हळवेपणा व्यक्त करते. पण सर्वात महत्त्वाचे हे की, ‘वास्तव आणि स्वप्ने’, ‘ध्येय आणि संघर्ष’ यामुळे मानवी नात्यांची देखील संवेदना बोथट होत जाते.” ..अशी ही विचार करायला लावणारी ही कविता आहे.
प्रा. लतिका जाधव,
गुरुकृपा सोसायटी, ओल्ड ओरबिस स्कूल समोर, लक्ष्मी एनक्लेव जवळ, मुंढवा- केशव नगर, पुणे ३६,
(९५९५९८३१००)
भारतात आणि जगातील अन्य देशात चार ते पाच प्रकारचे चंडोलपक्षी आढळतात.. इतर पक्षात आणि त्याच्यामध्ये ‘सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे ‘ जाण्याची एक अनामिक ओढ असते. यामुळेच जगभर अनेक प्रतिभावंत कवींच्या कवितेत या पक्षाने स्थान मिळवले आहे.
भारतातील चंडोल पक्ष्यांचा रंग पाठीवर मातकट तपकिरी आणि छाती- पोटावर काळा असतो. तो ओसाड जमीन, शेती व कोरड्या माळरानावर आढळतो. त्याचा रंग माळावरच्या दगड-मातीशी कमालीचा एकरूप झालेला असतो. माळावर हिंडत असताना ‘चिमण्या चंडोला’ च्या हालचालींना वेग आलेला असतो. थव्यातला एखादा चंडोल लाल-तांबड्या मातीत धूळस्नान करत असतो. कुणी तुरू-तुरू चालत गवतातले बी, किडे-कीटक टिपत असतो, तर कुणी दगडाच्या उंच सुळक्यावर बसून गोड सुरांची बरसात करत असतो.
चिमणा चंडोल’ पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. तो सुस्वर गातो व विलक्षण हवाई कसरतीही करतो. तो बाणासारखा हवेत झेप घेतो व पंख मिटून अतिशय वेगानं सूर मारत, गोड शीळ घालत खाली येतो. त्याचा तीरासारखा वेग पाहून एखाद्या नवख्या वाटेल, की हा आता जमिनीवर आपटणार, पण तोच हा पंख पसरून पुन्हा हवेत झेप घेतो व शेवटी एखाद्या उंचवट्यावर उतरतो.…
या पार्श्वभूमीवर …
प्रा. लतिका जाधव यांनी अगदी मोजक्या शब्दांत या कविते विषयी लिहिताना म्हटले आहे..
“निसर्ग आणि माणूस यात फरक कोणता? असा विचार ही कविता वाचल्यावर प्रथमदर्शनी नक्की मनात येतो. तुमचे जगणे, तुमच्या आकांक्षा यावर जगाचा सतत पहारा असतो.जे प्रत्येक व्यक्तीला अस्वस्थ करणारे असते.
इथे कवितेत ‘चंडोल’ पक्षी हा मुक्त पण संघर्षाचे प्रतीक आहे. कवी देखील मातीशी नाते सांगत आपल्या अवकाशात झेप घेत जीवनातील संघर्षाची भाषा व्यक्त करतो. बाळकृष्ण लळीत यांच्या या कवितेत ‘इंग्लिश कवी शेले, स्कायलार्क,चंडोल व क्लाऊड आॕफ फायर’ यांचा उल्लेख केला आहे. यांच्या संदर्भात असे स्पष्ट होते की, “एक प्रेरक दिशा दर्शक जगण्याची उमेद तीव्र करून पुन्हा चंडोलप्रमाणे हवेत सूर मारतो.
इथे कविता मन व जगताना येणारे अडथळे व जगात होणारा मनाचा कोंडमारा असे अनेक पैलू स्पष्ट करत हळवेपणा व्यक्त करते. पण सर्वात महत्त्वाचे हे की, ‘वास्तव आणि स्वप्ने’, ‘ध्येय आणि संघर्ष’ यामुळे मानवी नात्यांची देखील संवेदना बोथट होत जाते.” ..अशी ही विचार करायला लावणारी ही कविता आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.