महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वतीने दरवर्षी, मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२३ च्या या विविध पुरस्कारांसाठी, २०२२ साली (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२) प्रकाशित झालेल्या ग्रंथांच्या २ मागवण्यात येत आहेत.
कै. निर्मला मोने पुरस्कार हा ललित लेखनासाठी, कै. रा. श्री जोग पुरस्कार समीक्षा ग्रंथांसाठी, कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार नवोदित कवीच्या पहिल्या कवितासंग्रहासाठी, कै. शं. ना. जोशी पुरस्कार सामाजिक/ सांस्कृतिक/वैचारिक लेखांच्या पुस्तकासाठी, कै. द. वा. पोतदार पुरस्कार हा इतिहासविषयक पुस्तकासाठी देण्यात येतो.
सन २०२१ आणि २२ या दोन वर्षात प्रकाशित कविता संग्रहासाठी कुसुमाग्रज पुरस्कार देण्यात येतो. तरी या पुरस्कारासाठी साहित्यिक, प्रकाशकांनी २५ जानेवारी २०२३ पर्यंत कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० यांचे कडे पुस्तके पाठवावीत, असे आवाहन मसापच्यावतीने करण्यात आले आहे.