मंगळवेढा : महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतीना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांनी दिली.
पुरस्कार विजेते असे –
१. पंढरीनाथ जोशी पुरस्कृत विशेष पुरस्कार मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती पुरस्कार – नाती बांझ होताना (कवितासंग्रह) मनीषा पाटील हरोलीकर देशिंग
२. दिगंबर यादव पुरस्कृत पद्मीनी कृष्णा यादव स्मृती पुरस्कार – तुकोबा (कवितासंग्रह) डॉ. राजेंद्र दास, कुर्डुवाडी,
३. लहु ढगे पुरस्कृत सिध्दमाला ढगे स्मृती पुरस्कार – राजकिय मानदंड भाई गणपतराव देशमुख (चरित्र) – प्रा. डॉ. किसन माने, सांगोला
४. गिरीश पंडित पुरस्कृत मारोतीराव पंडित स्मृती पुरस्कार – हिप्पोक्रेटिसची शपथ – (कादंबरी) – डॉ. ऊर्मिला चाकुरकर, पैठण,
५. डॉ. शरद शिर्के पुरस्कृत इंदुमती शिर्के स्मृती पुरस्कार – हरवलेल्या कथेच्या शोधात (कथासंग्रह) – सिताराम सावंत, सांगोला
६. प्रकाश जडे पुरस्कृत इंदुमती जडे स्मृती पुरस्कार – मुक्ता (कादंबरी) – प्रतिभा जगदाळे, सांगली
७. संभाजी सलगर पुरस्कृत, ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार – पिपाणी (ललित) – विजय शेंडगे, पुणे
८. पंढरीनाथ जोशी पुरस्कृत मोहन भास्कर जोशी स्मृती पुरस्कार – पद्मकोश (कादंबरी) – रश्मी पदवाड मदनकर, नागपुर.
९. प्रा. पठाण शिवशरण पुरस्कृत, मसाजी शिवशरण स्मृती पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता (संशोधनात्मक संपादन) – प्रा. डॉ. संभाजी पाटील, लातुर
१०. श्रीमती ठोंबरे पुरस्कृत, शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती पुरस्कार – ग्रामीण कादंबरीतील स्त्री प्रतिमा (संशोधनात्मक ) – प्रा. डॉ. संतोष देशमुख, औरंगाबाद
११. उदय इंगळे पुरस्कृत, अमोल इंगळे स्मृती पुरस्कार – सुरस धातु गाथा (बालसाहित्य) – प्रा. डॉ. सुनिल विभुते, बार्शी
१२. इंद्रजित चव्हाण पुरस्कृत, सुरेश दनु स्मृती पुरस्कार, हिरवी हिरवी झाडे (बालसाहित्य) – प्रा. सुभाष कवडे, भिलवडी
१३. श्रीमती वासंती मेरु पुरस्कृत, वासुदेव शंकर मेरु स्मृती नवोन्मेष पुरस्कार – यशवंती शिंदे (मंगळवेढा).
१४. निशिकांत परचंडराव पुरस्कृत, चंद्रकला प्रल्हाद परचंडराव स्मृती , साहित्यप्रेमी पुरस्कार – कल्याणराव शिंदे (पंढरपूर)
या पुरस्कारांची निवड डॉ. दत्ता सरगर यांचे अध्यक्षतेखाली रेखा जडे, प्रा. विश्वनाथ ढेपे, भारती धनवे, सचिन गालफाडे यांचे समितीने केली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती शाखा अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.