लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर
लातूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारांचे हे 15 वे वर्ष आहे, अशी माहिती अकॅडमीच्यावतीने देण्यात आली आहे.
अकादमीच्या वतीने सन 2022 करीता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात आले होते. यात कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मकथा संपादीत व आंबेडकरी साहित्य या विषयावरील ग्रंथ मागविले होते. यातून प्रथम क्रमांकास -1500 रुपये, व्दितीय क्रमांकास – 1000 रुपये, तर तृतीय क्रमांकास – 750 रुपये तसेच सर्व विजेत्यांना शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी अविनाश देवशटवार, प्रा. डॉ. राजकुमार कलू मस्के, हे उपस्थित राहाणार आहेत. या पुरस्काराचे वितरण 06 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता लातूर येथे होणार आहे.
पुरस्कार विजेते असे –
कथासंग्रह –
प्रथम क्रमांक – “कोंडीबाचा वड” – शांताराम संभाजी लोखंडे, नवी मुंबई
व्दितीय क्रमांक – वाटणी – भास्कर बंगाळे, पंढरपूर
तृतीय क्रमांक – रंगप्रभा – सरोज देशपांडे, परभणी
कविता –
प्रथम क्रमांक – “आनंद” – अनुराधा लाहोरकर (खुपें), माजलगाव/बीड
द्वितीय क्रमांक -“प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे” – आशा अशोक डांगे, औरंगाबाद
तृतिय क्रमांक – ‘सर्व व्यापी कचऱ्यात राहुन सुध्दा ” – सुनिल लोणकर, जालना
कादंबरी
द्वितीय क्रमांक – “लढता लढता कोरोनाशी रक्ताळल्या प्रकाश वाटा” – डॉ मोहन दिवटे, लातूर
तृतीय क्रमांक – “खुशी” – जी. जी. कांबळे, लातूर
बालसाहित्य
व्दितीय क्रमांक – “मदतीचा हात” – ज्योती कपिले, ठाणे
तृतीय क्रमांक – प्रेरणादायी” – बबन शिंदे, कळमनुरी/ हिंगोली
आत्मचरित्र
प्रथम क्रमांक – “पकाल्या” – डॉ. खंडराव शिंदे, रुकडी/ कोल्हापूर
व्दितीय क्रमांक – “आठवणीचा डोह” – सुनिल गोसावी, अहमदनगर
तृतिय क्रमांक – “दुःखान गदगदलेलं झाड” – के. व्ही. सरवदे, कळंब / उस्मानाबाद
संपादित साहित्य:-
प्रथम क्रमांक – “बकुळगंध – राजन लाखे, पुणे
द्वितीय क्रमांक – स्वयंप्रभा – कमला सतपथी, तीसगाव, पाथर्डी
तृतीय क्रमांक – शेतकरी आत्महत्या – प्रा. डॉ. डी. टी. घटकार, लातूर
आंबेडकरी साहित्य
प्रथम क्रमांक – डॉ बाबासाहेब आंबडेकर यांची पत्रकारिता – डॉ. संभाजी पाटील, लातूर
व्दितीय क्रमांक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य – प्रा. गौतम गायकवाड, अंबाजोगाई, बीड
तृतीय क्रमांक – उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्य – पंडित कांबळे, उस्मानाबाद
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.