मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी नव्याने सुरू झालेल्या मोहीमेला ‘ मराठीच्या व्यापक हितासाठी ‘ चळवळ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचा पाठिंबा व सहभाग, मराठी भाषिक समाजाने देखील सहभागी होण्याचे आवाहन
प्रेमानंद गज्वी यांच्या ‘मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समिती ‘ द्वारे त्यांनी आणि महेश केळुसकर यांनी पुढाकार घेऊन मराठीला अभिजात दर्जा देण्याची केंद्र सरकारने जी टाळाटाळ चालवली आहे त्या पार्श्वभूमीवर नव्याने मोहीम हाती घेत व लेखकांना त्यात सहभागी करून घेत , केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना जे पत्र पाठवले आहे त्याचे ‘ मराठीच्या व्यापक हितासाठी ‘ चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी स्वागत केले असून ‘ मराठीच्या व्यापक हितासाठी ‘ चळवळीतर्फेतसेच महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे या मोहीमेला पाठिंबा व सहभाग जाहीर केला आहे.
प्रेमानंद गज्वी व डाॅ. महेश केळुसकर यांनी पुढाकार घेतलेल्या या मोहीमेमध्ये रंगनाथ पठारे ( अध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती),रामदास फुटाणे (अध्यक्ष, जागतिक मराठी अकादमी) वसंत आबाजी डहाके ( पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ), लक्ष्मीकांत देशमुख (पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), डॉ. रामदास भटकळ ( लेखक-प्रकाशक), कौतिकराव ठाले-पाटील ( अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद),रवींद्र शोभणे( कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ), कपूर वासनिक ( अध्यक्ष, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद), वामन पंडित ( वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग), डॉ. प्रदीप कर्णिक (मराठी संशोधन मंडळ), भिकू बारस्कर, (अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, कल्याण), रजनीश राणे ( संस्थापक, मराठी आठव दिवस), डॉ. हरिश्चंद्र बोरकर ( संस्थापक, झाडी बोली साहित्य मंडळ), यशवंत मनोहर, दादा गोरे, बाबा भांड, रोहिणी हट्टंगडी, किशोर कदम ‘सौमित्र’, अरुणा सबाने, सुनील कर्णिक, डॉ.अनुपमा उजगरे, ज्ञानेश महाराव, सुषमा देशपांडे, प्रतिमा जोशी, दिपक राजाध्यक्ष, राकेश सारंग, विजय केंकरे, राजीव जोशी, गिरीश पत्के, डॉ.सुरेश मेश्राम, युवराज मोहिते, सुनील महाजन, अरुण घाडीगांवकर, रवींद्र पाथरे, भालचंद्र कुबल, ताराचंद्र खांडेकर, प्रतिभा सराफ, प्रशांत वांद्रे, जनार्दन लवंगारे, विजय तारी, अविनाश गायकवाड, डॉ. महेंद्र भवरे, डॉ.अनिल सपकाळ, राकेश शिर्के, राजू तुलालवार, श्रीकृष्ण काकडे, डॉ.अनिल बांदिवडेकर, सतीश नाईक, डॉ. सतीश पावडे, डॉ.निशा शेंडे, डॉ.आशा मुंढे, भगवान हिरे, अजय कांडर, प्रा.अनिल सोनार, मंगेश विश्वासराव या मान्यवरांनी अगोदरच सहभाग नोंदवला असून सर्वच लेखक, कलावंत, पत्रकार, चित्रकार, व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर,वकील, आदींनी देखील आपला व्यक्तिगत आणि संस्था व संघटनात्मक सहभाग नोंदवावा असेही आवाहन डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
4 comments
मराठी ही जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये १० व्या स्थानी आहे.
माझा मराठीचा बोल कौतुके| परि अमृताते हि पैजा जिंके| ऐसी अक्षरे रसिके| मेळवीन ||
मराठी ही अभिजात भाषा आहेच. मात्र केंद्र सरकारने ही गोष्ट मान्य न करणे अन्यायकारक आहे. आता उशिरा का होईना ही चूक त्वरित दुरुस्त करून अन्याय दूर करावा.
अभिजात मराठी साठी अभिजात दर्जा देणेविषयी मराठी जनांना वारंवार मागणी करूनही जर नैसर्गिक न्याय मिळण्यापासून रोखले जात असेल तर त्यामागे कांही विकृत हेतूच कारणीभूत आहे हेच समजावे का …. न्यायिक अडथळे दूर होऊन रंगनाथ पठारे अहवाल सादर होऊन ही आज आठ वर्षांत जर पंतप्रधान कार्यालय चालढकल करीत असेल तर ते मराठी विरोधात समजावे का शासनाने तातडीने मराठीला अभिजात दर्जा प्रदान करावा ही विनंती
अभिजात मराठी साठी अभिजात दर्जा देणेविषयी मराठी जनांना वारंवार मागणी करूनही जर नैसर्गिक न्याय मिळण्यापासून रोखले जात असेल तर त्यामागे कांही विकृत हेतूच कारणीभूत आहे हेच समजावे का …. न्यायिक अडथळे दूर होऊन रंगनाथ पठारे अहवाल सादर होऊन ही आज आठ वर्षांत जर पंतप्रधान कार्यालय करीत असेल तर ते मराठी विरोधात समजावे का शासनाने तातडीने मराठीला अभिजात दर्जा प्रदान करावा ही विनंती