April 18, 2024
Nadbramha Gurukul Basari Vadan Guruvandana festival 2023
Home » नादब्रह्मच्या बासरीधुनची गुरुवंदना…
काय चाललयं अवतीभवती

नादब्रह्मच्या बासरीधुनची गुरुवंदना…

कोल्हापूरः नादब्रह्म संगीत गुरुकुलच्या १०० शिष्यांनी एका सुरात बासरीवादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवंदना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गोरंबे येथील जंगली महाराज आश्रमाचे अमृतानंद स्वामी आणि कात्यायनी येथील गोरक्षनाथ योगधामचे माऊली महाराज यांच्या हस्ते या विशेष बासरीवादन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी एकल बासरीवादन केले त्यांना प्रसाद लोहार यांनी तबला साथ दिली.

ज्येष्ठ वादक गोविंद माजगावकर, पंडित अरविंद मुळगावकर, पंडित अमोल दंडगे यांचे शिष्य डॉ. सचिन कचोटे यांनी तबलावादन केले. गुरुकुलचे संस्थापक अमोल राबाडे यांनी आभार मानले.

Related posts

नैसर्गिक ओम आकाराचा गड – सामानगड (व्हिडिओ)

एका प्रेमाची गोष्ट…

वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचा शाश्वत वापर याविषयी भारत आणि नामिबिया यांच्यात सामंजस्य करार

Leave a Comment