शेतजमीन मोजणीसाठी कसा व कोठे करावा अर्ज ? त्यामध्ये कोणती माहिती द्यावी लागते ? यामध्ये कोणते पर्याय आहेत ? मोजणीसाठी दर किती आहे ? या संदर्भात माहितीपर लेख खास आपल्यासाठी कृषि समर्पण समुहाच्या सौजन्याने…
⚖️ शेत जमीन मोजणी ⚖️
शेतकऱ्यांची जमीन किती आहे हे त्याच्या सातबाऱ्यावर दिसत असते. मात्र सातबारावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये अनेक वेळा तफावत होते मग अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हाच एक चांगला पर्याय असतो. आपल्या शेतजमिनीबाबत शंका निर्माण झाल्यास आपण यासाठी सरकारी कार्यालयाकडे दाद मागू शकतो यासाठी शेतकरी भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जाचा नमुना भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाईटवर (www.bhumiabhilekh.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.
कसा भरावा अर्ज?
👉🏻 वेबसाईटवर मोजणीसाठी अर्ज असे या अर्जाचे शिर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यात कार्यालयात अर्ज सादर करणार आहात त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागते.
👉🏻 त्यानंतर पहिल्या पर्याय पुढे अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. यात अर्जदाराचे चे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव आवश्यक असते.
👉🏻 त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असतो यातील मोजणीच्या प्रकार समोर कालावधी आणि उद्देश लिहावा लागतो. त्या पुढे पुन्हा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेत जमीन ज्या गट क्रमांकात येतो गट क्रमांक आवश्यक असतो.
👉🏻 तिसरा पर्याय सरकारी खजिन्यात भरलेल्या मोजणी फी ची रक्कम याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागतो. त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहावे. मोजणीसाठी जी फी आकारली जाते तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायचे आहे किंवा ती किती कालावधीमध्ये करून घ्यायचे आहे यावरून ठरत असते.
जमीन मोजणीचे साधारण तीन प्रकार पडतात…
साधी मोजणी – जी सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते.
तातडीची मोजणी – तीन महिन्यात करावी लागते.
अति तातडीची मोजणी – दोन महिन्याच्या आत केली जाते.
असे आहेत दर…
एक हेक्टर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये आणि तातडीच्या मोजणीसाठी दोन तर अति तातडीची मोजणी साठी तीन हजार रुपये आकारले जाते. त्यामूळे किती कालावधीत तुम्हाला मत मोजणी करून घ्यावी आवश्यक आहे. त्यानुसार कालावधी कॉलम मध्ये लिहू शकता.
उद्देश या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहावा लागतो. जसे की शेत जमिनीचा वाद जाणून घ्यायचा आहे, कोणी बांधावर अतिक्रमण केला आहे काय? याप्रमाणे आपला जो उद्देश असेल ते आपण देऊ शकतो.
चौथ्या प्रकारात काय?
यापुढील चौथ्या प्रकारात आपण सातबारा उतारा प्रमाणे जमिनीत वाटेकरी कोण कोण आहेत, म्हणजे ज्या गट क्रमांक ची मोजणी आणायची आहे त्या क्रमांकाचा सातबारा उतारा, एकापेक्षा अधिक जणांची नाव असेल तर त्यांची नावे पत्ता आणि मोजणीसाठी या सगळ्यांची समिती आवश्यक असते संमती दर्शकाच्या सह्या यावर आवश्यक असतात.
पाचव्या पर्यायात काय?
लगतची जमीन त्यांची नावे आणि पत्ता याची माहिती पाचव्या पर्यायात लिहावे लागते. तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ता त्या त्या दिशेने समोर लिहिणे आवश्यक असते. ही जमीन मोजण्यासाठी मोजणीचा अर्ज मोजणीची फी चलन किंवा पावती तीन महिन्याच्या आतील सातबारा ही कागदपत्रे प्रामुख्याने लागतात.
स्थावर मालमत्ता –
जर तुम्हाला शेतजमीन व्यतिरिक्तही तर जमिनीची असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर बांधला उद्योगाची जमीन याची मोजणी करायची असेल किंवा हद्द निश्चित करायचे असेल तर तीन महिन्याच्या मिळकतीची पत्रिका जोडावी लागते. ही सगळी माहिती भरून झाल्यावर योग्य कागदपत्र सहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करावयाचा आहे. अर्ज जमा झाला की तो ई-मोजणी या प्रणालीत नोंद होतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणी साठी किती रक्कम लागणार त्याचे चलन जनरेट केले जाते. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यांना बँकेत जाऊन भरणे आवश्यक असते त्यानंतर मोजणीचे नोंदणी क्रमांक तयार होते.त्यानंतर शेतकऱ्यांना मोजणी अर्जाची पोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख, त्यांचा मोबाईल अशी सविस्तर माहिती असते.
मोजणी ई प्रणाली काय आहे ?
आता आपण जी प्रक्रिया पाहिली ती ऑफलाइन पद्धतीने आहे. यात अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे.
( लेख सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य )