जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने नारंगी छटा उमटते…लाल रंगामधून दृढ संकल्पाची प्रेरणा मिळते तर पिवळा रंग सात्विक प्रवृत्तीचा विकास करतो या दोन्ही भावामुळेच निर्माण झालेल्या नारंगी रंगातून संसारातील मोह-माया यांचा त्याग करण्याची प्रेरणा उत्पन्न होते…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी….








