याच्या सततच्या वटवटीमुळे याला #राखीवटवट्या म्हणतात. इंग्रजीमध्ये #ashyprinia असे नाव आहे.चिमणीपेक्षा आकाराने लहान असतो. साधारणतः १३सेमी लांबी असते. मातकट राखाडी रंगाची पाठ आणि पोट पिवळसर काहीसी नारिंगी, डोळे लाल असतात. लहान कीटक, सुरवंट हे याचे आवडते खाद्य आहे. हा आपल्या भोवतालच्या परिसरात उंच झाडावर वा विजेच्या तारांवर सतत बसलेला आढळतो.
प्रशांत सातपुते, माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

Home » राखाडी रंगाच्या पाटीचा राखी वटवट्या…