June 25, 2024
Home » रंगमिश्रीत पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धत विकसित
संशोधन आणि तंत्रज्ञान

रंगमिश्रीत पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धत विकसित

शुद्धीकरणाची फोटोकॅटलिजिस ही पद्धत या संशोधकांनी शोधली आहे. सोन्याचे अतिसुक्ष्म कण ( गोल्ड नॅनोपार्टिकल्स) याचा वापर यामध्ये केला आहे. हे कण सूर्यप्रकाश शोषून घेतात. याला सरफेस प्लाझमोन असे म्हणतात. या गुणधर्मामुळे हे कण अनेक प्रक्रियामध्ये वापरले जातात. 

राजेंद्र घोरपडे

अनेक औद्योगिक कारखान्यातून रसायनमिश्रित, रंगमिश्रीत पाणी सोडण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. विशेषता वस्त्रोद्योग क्षेत्रातील कारखान्यातून रंग मिश्रित पाणी सोडले जाते. याचा धोका मोठा आहे. हे अशुद्ध पाणी नाल्याद्वारे नदीमध्ये मिसळ मिसळत असल्याने नदीतील असणारे शुद्ध पाणीही अशुद्ध होते. यासाठी नदीमध्ये पाणी सोडण्यापूर्वी या अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण करणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा रोगराईचा धोका होऊ शकतो. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी अनेक पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. मुख्यतः फिल्ट्रेशन पद्धत चारकोल किंवा कार्बन पद्धत पण या पद्धती खर्चिक तर आहेतच पण त्याबरोबरच वेळखाऊ आहेत. हे विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील कल्याणराव गरडकर यांनी यावर संशोधन करण्याचा विचार केला. शिवाजी विद्यापीठ आणि साऊथ कोरियातील विद्यापीठाच्या मदतीने हे संशोधन त्यांनी केले. सॅंग-वा ली, नाना गावंडे, अभिजित कदम, संतोष बाबर, अण्णा गोफने यांच्या सहकार्याने या संशोधनात संदर्भातील शोध निबंध सिरॅमिक्‍स इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

शुद्धीकरणाची फोटोकॅटलिजिस ही पद्धत या संशोधकांनी शोधली आहे. सोन्याचे अतिसुक्ष्म कण ( गोल्ड नॅनोपार्टिकल्स) याचा वापर यामध्ये केला आहे. हे कण सूर्यप्रकाश शोषून घेतात. याला सरफेस प्लाझमोन असे म्हणतात. या गुणधर्मामुळे हे कण अनेक प्रक्रियामध्ये वापरले जातात. उदाहणार्थ औषधाचे शरीरात वहन जलद गतीने व्हावे यासाठी या नॅनोपार्टिकल्सचा वापर केला जातो. धातक पदार्थांचा शोध घेण्यासाठीही गोल्ड नॅनोपार्टिकल्स वापरले जातात. कर्करोग, हृद्‌यरोग आणि इतर आजारांचे निदान करण्यासाठीही याचा वापर होतो. 

अशी आहे शुद्धीकरणाची पद्धत 

झींक रॉडवर (झेडओ) सोन्याच्या नॅनोपार्टिकल्सचा मुलामा देण्यात येतो. हा पदार्थ पाण्यातील रंग द्रव्यांचे सूर्यप्रकाशात विघटन करतो. यावरून संशोधकांनी अवघ्या अर्धा तासात सूर्यप्रकाशात 20 पीपीएम रंग द्रव्याचे विघटन होत असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे हे संशोधन पर्यावरणाच्यादृष्टीने फायदेशीर आहे. यात रासायनिक घटकांचा वापर न करता जैविक घटकांचा वापर केला गेला आहे. सोन्याचे कण हे बोराच्या पानापासून तयार केले आहेत. तर झेडनओ नॅनोड्‌स हे स्वस्तात मिळणाऱ्या झिंक ऍसिटेटच्या क्षारापासून कमी तापमानात तयार केले आहेत. 

पाणी शुद्ध झाल्याचीही तपासणी 

रंग मिश्रीत पाण्याच्या शुद्धीकरणानंतर हे पाणी शुद्ध झाले आहे की नाही याची तपासणीही या संशोधनात करण्यात आली. माशांच्या खवल्यावर या पाण्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास यात करण्यात आला. माशांचा डीएनएवर कोणताच परिणाम होत नसल्याचेही यात आढळले. हे शुद्धीकरण केलेले पाणी बागेतील फुलझाडे किंवा शेतीसाठी वापरले जाऊ शकते, असेही या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. 

Related posts

पाणी बचत बहुमुल्य गुंतवणूक

चक्क हवेतील कार्बन डाय-ऑक्‍साईडपासून इंधन

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406