फुलोर
दयतो दयन
म्हनतो कायनी
गावात लपल्या
अभागी बयनी
बोलता बोलेना
बयनी गुनाच्या
झाकल्या उरात
कायन्या सोताच्या
झोक्यावर झोका
हालल्या भावना
धावल्या झोंबल्या
बिलगल्या मना
मांडलं दयन
आठोल्या बयनी
म्हतारी लायनी
बोलल्या नयनी
फुलोर नवाळा
त्याईचं बोलनं
त्यातून फुललं
भुलाईचं गानं !
प्रतिमा इंगोले, मोबाईल – ९८५०११७९६९.
लाईक अन् कमेंट्स…