संक्रांत
आजच्या दिवस तरी
नजर तुझी भेटू दे
पापणी जरा झुकू दे
डोळ्यात हसू असू दे
आजच्या दिवस तरी
शब्द गंध उधळू दे
अबोल मौन होऊ दे
वाणी मुक्त बरसू दे
आजच्या दिवस तरी
मनाला मन भेटू दे
पतंग आभाळ जिंकू दे
जग सुंदर दिसू दे
आजच्या दिवस तरी
मनात तंटा नसू दे
तिळा ने स्नेह वाढू दे
बोलात गोडी असू दे
कवयित्री – पूजा दिवाण