सर्वोत्कृष्ट पोवारी साहित्य पुरस्कार जाहिर
गोंदिया – अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ आयोजित चौथ्या पोवारी साहित्य संमेलनाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधित प्रकाशित पोवारी साहित्यातून सर्वोत्कृष्ठ अशा चार पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यामध्ये कवी इंजी. गोवर्धन बिसेन लिखित ‘मयरी’ (पोवारी कविता संग्रह), प्राचार्य डॉ. शेखराम येळेकर लिखित ‘पोवारी ‘आराधना’ ( पोवारी कविता संग्रह ) बालसाहित्यिक गुलाब बिसेन संपादित ‘फिपोली’ (पोवारी बालकविता संग्रह) आणि इंजी. महेन पटले लिखित ‘पोवार’ (इतिहास संशोधन) या पुस्तकांचा यात समावेश आहे.
यासोबतच पोवारी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल साहित्यिकांची ‘पोवारी साहित्य रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ऋषि बिसेन, प्राचार्य डॉ. शेखराम येळेकर, इंजी. गोवर्धन बिसेन, प्रा. डॉ. प्रल्हाद हरिणखेडे, तुमेश पटले, उमेंद्र बिसेन, छाया सुरेंद्र पारधी, वंदना बिसेन (कटरे), वर्षा रहांगडाले ( पटले ), गुलाब बिसेन, शारदा चौधरी ( रहांगडाले), पालीकचंद बिसने, रणदीप बिसने, शेषराव येळेकर, यशवंत कटरे, प्रा. डॉ. हरगोविंद टेंभरे या साहित्यिकांचा समावेश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.