प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजी उबारे, बा. स. जठार आणि डाॅ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या साहित्याचा समावेश आहे.
श्रीरामपूर येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी जाहीर केले आहेत. सन 2021 साठी विविध साहित्य प्रकारातील १२ लेखकास पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून पुरस्कार दिले जातात.
या वर्षाचे पुरस्कारांचे मानकरी असे…
१)डोहतळ – मारुती कटकधोंड, राजस्वनगर, सोलापूर.
२) अस्तित्व – संभाजी उबारे, सांगरुळ, ता. करवीर.
३) एक भावविश्व – डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, जयसिंगपूर ता. शिरोळ.
4) गावकुसातल्या गोष्टी – डॉ. शिवाजी काळे, श्रीरामपूर.
५) अक्षरी – सुधाकर नथू भामरे, खुंटेवाडी, ता. देवळा
६) सतारीच्या तारा – अँथनी परेरा, वसई.
७) आई – वडील आणि आम्ही – शंकरराव अनारसे, श्रीरामपूर.
८) तुकोबांच्या कुळातील वंश – संतोष कांबळे, वडेले ता. मालेगाव.
९) फिरत्या चाकावरती – प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर
१०) कोरोना: भयप्रद – भयकंपित इतिहास – प्रा. विजयकुमार भवारी , पुणे
११) कृतज्ञ मी… कृतार्थ मी – डॉ. श्रीकांत भालेराव -टाकळीभान.
१२) भाकरीची शपथ – बा. स. जठार – गारगोटी.
या पुरस्कार वितरण सोहळ्याची दिनांक व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती श्री, भोसले यांनी दिली आहे.