मर्ढेकरांच्या मुंगीमुळे मराठी कवितेत जसा बदल झाला.असाच बदल “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला.ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे.
– डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले
नगर जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या राजे संभाजी साहित्य पुरस्कारासाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीची निवड झाली आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये डाॅ. द .ल .फलके , डाॅ. लक्ष्मीकांत येळवंडे , डाॅ. राजाराम सोनटक्के, डाॅ. सुवर्णा गुंड यांचा समावेश होता .या कादंबरीस मिळालेला हा पाचवा पुरस्कार आहे. रोख रक्कम ,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असल्याची माहिती मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आ. य. पवार यांनी दिली आहे.

डाॅ. बाळासाहेब लबडे हे गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात मराठी विभाप्रमुख म्हणून आहेत. ते साहित्यिक, समीक्षक, कवी, कादंबरीकार, संपादक, संशोधक, गीतकार,आहेत. त्यांची आत्तापर्यंत १२ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना राज्यस्तरिय १८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोकणातून, मराठीसाहित्यापासून ते अमरिकेपर्यंत दखलपात्र ठरलेले साहित्यिक आहेत. सध्या प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमात त्यांची कविता आहे. विविध विद्यापीठांच्या अभ्याक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी दोन चित्रपटांना त्यांची गाणी आहेत.
“पिपिलिका मुक्तिधाम” विषयी समीक्षकांनी मते
मर्ढेकरांच्या मुंगीमुळे मराठी कवितेत जसा बदल झाला.असाच बदल “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला.ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे.
– डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले……………
पिपिलिका मुक्तिधाम” ही कादंबरी मराठी कादंबरीतील बहुआवाजी, प्रयोगशील , मराठीतील महत्वाची दखलपात्र कादंबरी आहे.
– डाॅ दिलीप धोंडगे………….
मराठी कादंबरीत दखल घ्यावी अशी ही आगळीेवेगळी कादंबरी आहे. यातील निवेदन, विरूपण, काव्यात्मकता, प्रयोगशीलता, वास्तवता, अतिवास्तवता, संज्ञाप्रवाह, शैलीआविष्कार थक्क करणारे आहेत. मराठी कादंबरीत नव्या आवाजाची ही कादंबरी आहे
– बाबाराव मुसळे…………….
मराठी कादंबरीतील पिपिलिका मुक्तिधाम” ही कादंबरी मनोविश्लेषणात्मक प्रवाहातील नव्या मानदंडाची कादंबरी आहे
– प्रा साईनाथ पाचारणे…………….
“पिपिलिका मुक्तिधाम “कथनाच्या अंगाने नव्या वळणावरची पुरूषोत्तम बोरकरांच्या मेड ईन इंडियाच्याही पुढची कादंबरी आहे .
– डाॅ. किसन पाटील……………
“पिपिलिका मुक्तिधाम” ही मराठीत पहिली अभिजात उत्तरआधुनिक मेटाफिक्शन म्हणून अढळ स्थान राहील अशी कादंबरी आहे
– प्रा डाॅ.आनंद पाटील…………..
जागतिक कादंबऱ्यांच्या रांगेतील प्रभावी जीवनचित्रण करणारी नव्या मेटाफरची कादंबरी पिपिलिका मुक्तिधाम आहे.
– डाॅ. रामेश्वर सोळुंखे………..
“पिपिलिका मुक्तिधाम” ही समकालाच्या अवकाशात सामान्यांच्या प्रश्नांना भिडणारी कादंबरी आहे. हे प्रश्न जसे स्थानिक आहेत. तसेच राजकीय , सामाजिक , आर्थिक पटलावरचे मांडणारी नवीन मूल्ये रूजवणारी अस्वस्थतेचे कोलाज असणारी कादंबरी आहे.
– दा .गो .काळे…………
पिपिलिका मुक्तिधाम ही परकाया प्रवेशाची एक अद्भुतिका वाटते. ज्यात चार मुंग्या जगण्याचा अर्थ शोधत आहेत. त्यासाठी वेगवेगळे देह धारण करीत आहेत. ही कादंबरी आत्मानुभूतीची अविरत अंतर्यात्रा आहे .
– प्रतिक पुरी
…………..
“पिपिलिका मुक्तिधाम” ही मराठी कादंबरीच्या प्रवाहातील नव्या टप्प्यावरची एक आव्हानात्मक कादंबरी आहे .
– धनाजी घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.