ईश्वरप्रणिधानाद्वा या सूत्रात समाधी कोणकोणत्या उपायांनी/मार्गांनी होते, हे सांगत असताना,’ ईश्वरप्रणिधाना’नेसुद्धा समाधीचा लाभ होतो असे म्हटले आहे.
लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड
ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?
सत्य – संकल्प (सत्य संकल्पाचा दाता भगवान) असणे. आपण काया, वाचा, मने करून जे काम करतो, ते आणि त्याचे फळ या दोन्ही गोष्टी ईश्वराला समर्पित कराव्यात. आपण रोज’कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा जे जे करत असतो, ते सारे’नारायणायेति समर्पयामि’ हे म्हणतच असतो. पण आपण तसे खरोखरच तसे करत असतो, की यांत्रिकतेने तसे म्हणत असतो, यांचा विचार करून त्रिकरणपूर्वक (काया, वाचा, मने) केलेली कर्मे ईश्वरार्पण करावीत. त्यामुळे सुद्धा ‘समाधी’चा लाभ होतो. योगशास्त्र केवढे लवचिक आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड.
ते तुझिये गुरूकृपादृष्टी । निर्विष होय ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ) – https://iyemarathichiyenagari.com/2021/01/01/dnyneshwari-article-by-rajendra-ghorpade-in-vishwache-aart-3/
Posted by Iye Marathichiye Nagari on Thursday, December 31, 2020
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.