📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२५ साठी आवाहन

पुस्तकांच्या ढिगावर ट्रॉफी आणि पदक असलेले साहित्य पुरस्काराचे प्रतीकात्मक क्लिपआर्ट

चंद्रपूर – जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मागील सोळा वर्षापासून हे मानाचे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे सतरावे वर्ष आहे.

या वर्षीच्या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, आत्मकथन या पाच साहित्य प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

कृपया कुणीही बालसाहित्य पाठवू नये. असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच (कुरीयरने पाठवू नये) पाठवाव्यात.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता ः डॉ.अनंता सूर (भ्र.९४२१७७५४८८), कल्पना मार्बलमागे, छोरीया ले आऊट, गणेशपूर, ता – वणी, जि – यवतमाळ पिन ४४५३०४ या पत्त्यावर ३० एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावे, असे आवाहन डॉ.अनंता सूर यांनी केले आहे .

Related posts

लिहित्या हातांचा आधारवड : चंद्रकुमार नलगे

डॉ. राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar