June 7, 2023
Bhimthadi Marathi Sahitya Samhelan Chouphula
Home » भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दौंड मधील चौफुला येथे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दौंड मधील चौफुला येथे आयोजन

  • ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती
  • राज्यस्तरीय दुसरें संमेलन २७ व २८ मे रोजी चौफुुला येथे होणार

दौंडः भीमथडी मराठी साहित्य परिषद व मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने चौफुला ( ता. दौंड ) येथे दुसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि.२७ व २८ मे २०२३ रोजी होणार आहे.अशी माहिती संंमेलनाचे मुख्य् प्रवर्तक व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली

संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त राजाभाऊ जगताप, डॉ भालचंद्र सुपेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक संजय सोनवणे, दीपक पवार, बाळासाहेब मुळीक, सुशांत जगताप, विजय तुपे, बाळकृषण काकडे,आनंद बारवकर, कैलास आबा शेलार,अरविंद जगताप, राहुल यादव,रामभाऊ नातू आदी उपस्थित होते.

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत, संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कलावंत यांनी ९८८१०९८४८१, ८८०५५११०६० , ९८५०२०६९७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संजय सोनवणे यांनी केले आहे,

Related posts

परीक्षेचे राजकारण…

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

भूमार्ग, जलमार्ग हेच उन्नतमार्ग…

Leave a Comment