हलकर्णी ( ता. चंदगड ) – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांच्या ‘सृजनगंध’ या समीक्षा ग्रंथास तासगाव (सांगली) येथे ‘शिविम’ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत डाॅ. शिवकुमार सोनाळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन हा पुरस्कार देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ महाराष्ट्रातील एक अग्रेसर संस्था आहे. या संघातर्फे अनेक उपक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यासह सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक असे विविध क्षेत्रात कार्य चालते. मराठी भाषेसाठी संघ सातत्याने कार्यरत असतो. शिवाजी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन मराठी प्राध्यापकांच्या ग्रंथलेखनास संघातर्फे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात.