1.Silver line रूपरेखा
भक्षकांच्या तावडीतून वाचण्यासाठी फुलपाखरांमध्ये विविध प्रकारचे संरक्षक उपाय योजना आढळतात मग वेगाने वाकडे तिकडे उडणे ( erratic flight) पंखांवर डोळ्यासारखे चित्र असणे (aposematic) आणि परिसराशी सुसंगत रंगसंगती camouflage) असे गुणधर्म उत्क्रांती पर्वात फुलपाखरांनी आत्मसात केले आहेत. त्यातील अजून एक गुणधर्म म्हणजे शेपटीकडे सुद्धा डोके आणि शुंडीका सारखी रचना आणि यांच्या खऱ्या अँटिना सारख्या हालचाली यामुळे भक्षकांचे लक्ष्य डोके समजून तिकडे आकर्षित होते आणि जिवावरचे पंखावर निभावते.
मुख्यतः ब्लु कुळातील सिल्वर लाईन फुलपाखरांच्या प्रजातीमध्ये हा गुणधर्म दिसतो. अतिशय सुरेख दिसणारी रूपरेखा पंखवरील चंदेरी रेखांमुळे ओळखता येते. आपल्या खाद्य वनस्पतीच्या आसपास राहणारे उडले तरी पुन्हा एकाच जागी येऊन बसणारे आणि फार दूर न जाणारे हे फुलपाखरू शुष्क भागात जास्त आढळते. कुंपणाला वापरले जाणारे मेंदा सारखे वनस्पती यांची खाद्य वनस्पती आहे. या मध्ये अनेक प्रजाती आहेत. यातील abnormal silver line अतिशय दुर्मिळ प्रजाती असून नष्टप्राय होऊ घातलेली प्रजाती आहे. वनस्पती पेक्षा विशिष्ट मुंग्यांशी असलेले सहजीवन यांना अधिक दुर्लभ बनवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.