डॉ. शेख सध्या साई लाईफ सायन्स हैदराबाद येथे दहा वर्षापासून वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. अडचणीच्या काळात झालेली मदत ते आजही विसरले नाहीत. यासाठी ते गरजू विद्यार्थ्यांना NET, SET, GRE, TOFFL, GATE या परीक्षाविषयी विनामूल्य मार्गदर्शन करतात. आपण कुठेतरी समाजाचे देणे लागतो म्हणून धुळ्यामध्ये रिसर्च स्कॉलर्स अॅकॅडमी सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे.
aariflatifshaikh@gmail.com
संशोधक डॉ. आरिफ लतीफ शेख यांनी जपानमधील परिषदेमध्ये कॅन्सर उपचारावर व्याख्यान दिले. कॅन्सरवरील उपचारासाठी β-lactam antibiotics चा वापर हा शेख यांचा शोध निबंध प्रकाशित झाला आहे. यावरच त्यांनी मार्गदर्शन केले. जपानमधील अशियन पॅसिपिक सोसायटी फॉर मटेरिअल सायन्स (APSMR2001) या संस्थेने हीआंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.
कोविड-19 उपचारावर वापरण्यात येणाऱ्या औषधी बनविण्यामध्ये सुद्धा डॉ. शेख यांचे फार मोठे योगदान आहे. कोविड -19 संशोधनावर आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा एक शोधनिबंध तर कॅन्सर थेरपीवर 19 शोध निबंध प्रसिद्ध आहेत.
डॉ. शेख यांच्या घरची परिस्थिती गरीबची होती. त्यांना बी. एस. सी. नंतरचे पुढील उच्चशिक्षण घेणे अवघड होते. धुळ्यातील मच्छीबाजाराजवळ एका लहानशा घरात रहाणाऱ्या शेख यांनी जिद्द व महत्त्वाकांक्षेने वरीष्ठ शास्त्रज्ञ पदापर्यंत मजल मारली. डॉ.आरिफ शेख यांना उच्चशिक्षणासाठी पैशांची गरज असतांना त्यावेळेस झेड. बी. पाटील महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांनी त्यांना फाऊंडेशन फॉर एक्सलन्सही अमेरिकेची शिष्यवृत्ती मिळवून दिली. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांनी पुढे पुणे विद्यापीठाची एम. एस्सी. (ऑरगॅनिग केमिस्टी) ही पदवी प्रथम श्रेणीसह मिळविली. नंतर त्यांनी पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) 2007 मध्ये पी. एच. डी. पूर्ण केली. नंतर त्यांना पाच वर्षे अमेरिकेची फेलोशिफ मिळाली. त्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट ही पदवी मिळविली. नंतर त्यांनी जर्मनीमधील फ्रेले विद्यापीठ बर्लिन येथे शास्त्रज्ञ म्हणून काम केले.
डॉ. शेख सध्या साई लाईफ सायन्स हैद्राबाद येथे दहा वर्षापासून वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. अडचणीच्या काळात झालेली मदत ते आजही विसरले नाहीत. यासाठी ते गरजू विद्यार्थ्यांना NET, SET, GRE, TOFFL, GATE या परीक्षाविषयी विनामूल्य मार्गदर्शन करतात. आपण कुठेतरी समाजाचे देणे लागतो म्हणून धुळ्यामध्ये रिसर्च स्कॉलर्स अॅकॅडमी सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे.
डॉ. शेख यांच्या या यशाचे जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ.अरुण साळुंके, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सेक्रेटरी दादासाहेब, प्रदिप भदाणे, संचालक भैय्यासंगे अजित मोरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार यांनी कौतुक केलेले आहे.