December 8, 2022
Home » सुर्याभोवती खळे पडण्याचे काय आहे शास्त्रीय कारण
नव संशोधन आणि तंत्रज्ञान

सुर्याभोवती खळे पडण्याचे काय आहे शास्त्रीय कारण

हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थमधून जातात, तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते.


प्रा . डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर

सूर्याभोवती पडणारे खळं हे भौतिकशास्त्रामधील ऑप्टीकसचा भाग आहे .सूर्या भोवतालचे खळं किवां रिंगण हा प्रिसममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसाच हा प्रकार आहे. या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजी मध्ये हॅलो (halo)असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात. 

वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांच्यामध्ये लाखोंच्या संख्यने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते. यामध्ये बर्फाचे असणारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात. पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १. ३३ आहे. पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो. त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थमधून जातात, तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो, तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्याभोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते.

लेखन –  प्रा . डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर

Related posts

चक्क हवेतील कार्बन डाय-ऑक्‍साईडपासून इंधन

गोकर्णपासून चहा !…

खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध

Leave a Comment