कोष्टी साधारणपणे किटक, कृमी किंवा लहान पाली, बेडूक खातो. पण, काही अर्कनिड्स कुळातील कोष्टी खूपच खादाड असतात. त्यांच्या आकारापेक्षा ३० पट अधिक मोठा असणारा सापही ते खाऊ शकतात, असे मत एका संशोधनात मांडण्यात आले आहे. या संशोधनावर आधारित हा लेख…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
ऑस्ट्रेलियन रेडबॅकला पाय नसतात. या कोष्टीच्या प्रजातीची मादी छोट्या आकाराची असते. पण, तिच्यापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष ती खाऊ शकते. उदाहरणार्थ- जगातील सर्वांत विषारी तपकिरी साप. रेडबॅकच्या जाळ्यात हा तपकिरी साप अडकला तर तो त्याला भक्ष करतो, असे मत मार्टिन निफेलर आणि जे. व्हिटफिल्ड गिबन्स या संशोधकांनी जर्नल ऑफ अरॅक्नोलॉजीमध्ये प्रकाशित शोधनिबंधात व्यक्त केले आहे. येथे दोघेही जॉर्जिया आणि बासेल येथील अमेरिकन विद्यापीठात संशोधनाचे काम करतात.
सापाला कोष्टी कसे मारतो?
कोष्टीच्या जाळ्यात साप अडकल्यावर तो अडकलेला साप बाहेर पडण्यासाठी झटापट करतो. तेव्हा सर्वप्रथम तो कोष्टी लांब, चिकट रेशीम धाग्याचा गुंता तयार करतो. त्यात हा साप अधिकच गुंतत जातो. गुंतलेल्या सापास संधी साधत हा कोष्टी विषाचा दंश करून त्याला मारतो, असे मत मार्टिन निफेलर आणि जे. व्हिटफिल्ड यांनी शोधनिबंधात व्यक्त केले आहे.
या संदर्भात संशोधकांनी कोष्टीने साप मारून खाण्याच्या ३१९ घटनांची नोंद घेतली. त्यानंतरच त्यांनी हा दावा केला आहे. अंटार्क्टिका सोडून जवळपास सर्वच खंडांमध्ये या घटनांची नोंद या संशोधकांनी केली. कोष्टीने सापाला भक्ष केल्याच्या जवळपास ५१ टक्के घटना या अमेरिकेत, तर २९ टक्के घटना ऑस्ट्रोलियात नोंदविल्या आहेत. पकडण्यात आलेले साप आकाराने लहान असतात. सरासरी २५ ते २७ सेंटिमीटर लांबीचे असतात. अकरा कुळातील ४० प्रजातींचे कोष्टी हे सापांना भक्ष बनवतात, असे मत संशोधकांनी नोंदविले आहे. यात ऑस्ट्रोलियन रेडबॅक स्पायडर (Latrodectus hasselti), आफ्रिकन बटन स्पायडर (Latrodectus indistinctus), इस्राईल बिडो स्पायडर (Latrodectus revivensis), तर नॉर्थ अमेरिकन विडो स्पायडर (Latrodectus geometricus, Latrodectus hesperus, Latrodectus mactans and Latrodectus variolus) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
संशोधकांनी व्यक्त केली ही शंका…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.