देशात पर्यटन विकासासाठी 65 दीपगृह पर्यटन प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. यापैकी पाच प्रकल्प महाराष्ट्रात करण्यात येत आहेत अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
काय आहे दीपगृह पर्यटन प्रकल्प ?
द्वीपगृहाचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केला जातो. यामध्ये विद्यमान दीपगृहे आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराला पर्यटन स्थळ, सागरी लँडमार्क आणि हेरिटेज परिसर म्हणून विकसित करण्यात येणार आहे आणि राष्ट्रीय सागरी संग्रहालये आणि राष्ट्रीय प्रकाश गृह संग्रहालये यासारख्या संबंधित सागरी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी या पद्धतीने पर्यटन विकासासाठी निर्धारीत केलेल्या 65 दीपगृहांची राज्यनिहाय यादी –
गुजरात – 13
तमिळनाडू – 11
केरळ – 10
आंध्रप्रदेश – 09
महाराष्ट्र – 05
कर्नाटक – 05
ओडिसा – 05
पश्चिम बंगाल – 03
अंदमान आणि निकोबार – 02
लक्षद्विप – 01
गोवा – 01
डॉल्फिन नोज दीपगृह प्रकल्प सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. केरळ राज्यात, पर्यटन विकासासाठी निश्चित केलेल्या,सार्वजनिक खाजगी भागीदारी पध्दतीच्या (PPP मोडवर) 10 दीपगृहांचे किनारपट्टी नियमन क्षेत्र(कोस्टल रेग्युलेशन झोन, CRZ)आरेखनाचे कार्य पूर्ण झाले आहे. या 10 दीपगृहांपैकी कन्नूर दीपगृहासह सहा (06) दीपगृहांसाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (CRZ) मंजुरी मिळविण्यात आली आहे. उर्वरित चार (04) दीपगृहे विकास बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र (“नो डेव्हलपमेंट झोन”,NDZ) याअंतर्गत येतात,ज्यात कायमस्वरूपी बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. किनारपट्टी नियमन क्षेत्र(CRZ) मंजुरी मिळाल्यापासून आणि नगर विकास आणि केंद्रीय नियोजन विभागाची मान्यता मिळाल्यापासून दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
केरळमध्ये दीपगृह पर्यटन प्रकल्प हाती घेण्यासाठी 11 खाजगी भागधारकांनी स्वारस्य व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात उत्तन पॉइंट, कोर्लई किल्ला, जयगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ठिकाणी हे दीपगृह पर्यटन प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. असे सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.