May 27, 2024
Onion seed drying and storage informative article
Home » कांदा बी सुकवणे व साठवण
फोटो फिचर

कांदा बी सुकवणे व साठवण

कांदा बी सुकवणे व साठवण

  • मळणी केलेल्या कांदा बियाण्यात १० ते १२ टक्के आर्द्रता असते म्हणून स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे.
  • साठवणीसाठी बियांमध्ये सामान्यतः ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता नसावी. अशा बियांचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त राहिला तर बियांची उगवण क्षमता कमी होते.
  • बी जास्त दिवस साठवण्यासाठी आर्द्रता रोधक पिशव्यांचा वापर करावा. पिशवीत बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता नसावी.
  • सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले तर बी जास्त काळ टिकू शकते.
  • बियांच्या पॅकिंग साठी हवाबंद टिनाच्या डब्यांचा पण वापर केला जातो.
  • पॅकिंग केलेल्या बियांण्याच्या पाकिटावर अथवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवण क्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करावी.

सौजन्य – कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे

Related posts

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

सीमेवरील जवानाप्रमाणे साधनेतही जागरूकता, दक्षता हवी

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406