March 28, 2024
zhadiboli-literatue-and artists award
Home » झाडीपट्टीतील साहित्यिक, कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन
काय चाललयं अवतीभवती

झाडीपट्टीतील साहित्यिक, कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

झाडीपट्टीतील साहित्यिक व कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने साहित्यिक व कलावंताना पुरस्कार देण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या चार जिल्ह्यातील लेखक/कवींच्या उत्कृष्ट साहित्यास यंदा पुरस्कार देण्याचे ठरले आहे. त्यासाठी कवी लेखकांनी आपल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती , डॉ. चंद्रकांत लेनगुरे, चामोर्शी रोड, साईनगर, गडचिरोली या १५ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवाव्या.

पुरस्कारासाठी निश्चित केलेले गट असे –

गट १) झाडीबोलीतील उत्कृष्ट पुस्तकास १ पुरस्कार – (यात कथा, कविता, कादंबरी, वैचारिक सर्व साहित्य प्रकार समाविष्ट असेल.) यामधून फक्त एका पुस्तकाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
गट २) प्रमाण मराठी भाषेतील कविता संग्रहास एक आणि कवितासंग्रह व्यतिरिक्त इतर साहित्य प्रकारास एक असे दोन पुरस्कार
गट ३) मध्ये लोक कलावंत पुरस्कार – १
(यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रमाणपत्रासह सादर करावा)

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवणारा लेखक, कवी, लोक कलावंत हा झाडीपट्टीतीलच असावा. अशी अट निश्चित करण्यात आली आहे. चारही पुरस्काराचे स्वरूप – एक हजार एक रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल , श्रीफळ असे आहे. तरी झाडीपट्टीतील लेखक, कवींनी पुरस्कारासाठी प्रकाशित ग्रंथ वेळेत पाठवावे, असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे सचिव कमलेश झाडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – ९४२३६४६७४३

Related posts

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

नैसर्गिक प्रेमातून अमरत्वाची प्राप्ती

चांगल्या कर्मातून फळेही चांगलीच

Leave a Comment