April 26, 2024
zhodapa-zhadiboli-story-collection-by-laxman-khobragade
Home » झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून
मुक्त संवाद

झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून

(आगामी *झोडपा* या झाडीबोलीतील कथासंग्रहातून )
🌹🌹 *खरी कमाई* 🌹🌹

बन्यानीला जागोजागी भोक पडलेले , डोक्यावर फाटक्या दुपट्याचा फेटा बांधून टोंगऱ्यावरी सुतना गुंडलेला स्यामराव काड्या फोडून फोडून घामा गिरगिरा झाला . पोटात कावडे बोंबलत होते . हाताच्या सिरा कामाच्या तानाने थकून इसाव्यासाठी थडथड लवत होत्या . पन पोटासाठी घटकाभर थांबून चालणार नाही , याची जान असलेला स्यामराव दुपट्याचा सेला धरून घाम पुसत पुसत अंकीन चेव आनत कुराडीचा वार तेज करून अख्या गाडाभर लाकडाच्या झिलप्याची सूड उबी करत होता . रकरकत्या तपनीत येवडी उरक आली कसी ? डोक्याव चडलेला सुर्वे मरनाची आग वकत होता , आंगोड करताना विसन टाकूनइ सायता होनार नाइ येवढा कडलेला चरवीतील पानी घस्याची कोरड कसी घालवनार , तरी तपनीने गरम झालेला गडवा गिलास जेवढा लासून गिऱ्या पडलेल्या हाताला चरचर झोंबत होता , त्याइपेक्स्या अदीक कोनतीतरी चेतना सगऱ्या महातनीभर मनात सीतरता तयार करत होती . केलेस पायजे थांबून उपाव नाई , या येका जिद्दीने लायकवनाऱ्या तपनीला पराभूत करायला जनू युद्धातला वीरस कंबर कसून मैदान गाजवत होता .

बापजाद्यापासून मातीकाम आन लोकायची वनमजुरी करत कदी अडल्या नडल्या कामाले धावून येनारा स्यामराव पोराच्या सुकी जीवनासाठी धुंदाडीतही टिकून रायलेल्या झाडासारका गरिबीतइ साबीमानान कस्ट करायला बारा हत्तीचे बळ आनायचा . आपल्या वाट्याला आलेले भोग पोराला भोगावे लागू नये , सिकुन सवरून त्याला मोठे केले की आपले दिवस पालटले पायजे यासाठी थ्याच्या सिक्स्यनात कमी ठेवायची नोहती स्यामरावला . गरिबीच्या झडा समींदराच्या खोलीहुन अधिक रिदयात हालअपेष्टांनी भगदाड पाडत होत्या . गरिबीची खाई दिवस रात थ्याच्या कारजाले चिरे पाडायची , मनूनस पोराच्या रूपाने स्यामराव गरिबीचा उतारा शोधू लागला . घाव पडला की त्यावर मलम लावून घाव बुजतात . हरेक आजाराला उपाव असतेस ,असी धारना करूनस त्याने पोराच्या प्रतेक गरजा पुऱ्या करन्यास कोनतीस कसूर ठेवली नाई . पोरात कमीपना येऊ नये मनुन थ्याच्या परतेक गरजा सोता लक्स्य देऊन पुऱ्या कराचा .स्याडा अन अब्यास यातस पोराने गुतून रावे , मनुन स्यामराव दिवसाची रात करत होता . फक्त जन्माला घालून होत नाइ तर आयुस्याची घडन करता आली पायजे , असे तो नेहमी मनाचा . त्यात त्याचा मतलब असला तरी तो विधायक होता.

किसन मंजे कोरस्याच्या खदानीत चमकनारा हिरास मनावा लागेल . रंगारूपान गोरागोमटा , कुरडे केस आन साक्स्यात कन्हैयाची मूर्ती सोबावी असे हास्य . गोल गोबऱ्या गालाचा किसन साऱ्या गावात लाडका होता . दोस्तमित्रात त्याच्या खोड्या हव्याहव्यास्या वाटायच्या . मधूर आवाजात किसनने केलेल्या सूचना सप्पा मित्र आवडीने पुरे करायचे .कारन जेवढा खोडकर तेवढास अब्यासात अव्वल किसन नाच -गाने आन खेलात कोटीस कमी नोयता . स्यामरावच्या अपेक्स्याची जान नसलेला , साऱ्या गोस्टी हट्टानुसार भेटत गेल्याने किसन जेवढा हूस्यार तेवढा खोडकर बनत होता . हरेकांनी आपल्या मागेस रावे , आपला सबूद कोनी खाली पाडू नये मनुन किसन कदी चिडून त कदी खाजा देऊन नेता बनासाठी गुंग राहाचा . पोरानी बाकीच्या भानगडीत न पडता अब्यासात ध्यान द्यावा मनुन स्यामराव ओरडायचा . कदी कोनी तक्रार घेऊन आला तर चिंतेने थ्याचा कारज खालीवर होवाचा . पन पोरगा हरवक्ती पयला नंबर आनतो या समाधानाने तो काही येरा गापिल रावाचा . दिवसरात कस्टात बुडलेला स्यामराव पोटाला चिमटा देत अदिक जोमाने राबला पन किसनला काई कमी पडू नये मनुन आपल्या होनाऱ्या हाडाच्या काड्याकडे कानाडोरा करायचा . गरिबीत राहूनइ गरिबीची झड न लागता सारे आयते मिडत गेल्याने किसनला कस्टाची किंमत काय समजायची?

“आमचा आयुस्य दगदगीत गेला , पन पोरा तुज्या करतुतीने आमाले सुक दावजो .” या स्यब्दाचा किसनला वाडत्या वयाबरोबर वीट यायला लागला . “मले सप्पा समजते गा , लान पोरावानी उगास सिकवत जाऊ नोको . मी सगरा बरोबर करतो , बाकीच्यासारका ढ थोडास आहो .सप्पा पोर त माज्या मांग मांग रायतेत. त्याइले माज्यासीवा करमे नाई . मी सिकवीन सांगीन तेस करतात.” स्यामरावला हे आयकून बरे वाटत असले तरी पोराचा वाढलेला गर्व पाहून मनात भीतीचे अंधार दाटून यायचे . त्याला कारनइ तसेस होते . काई वर्षापूर्वी गावातील सातविवरी सिक्स्यन घेऊन मोरच्या सिक्स्यनासाठी बाहेरगावी गेलेला किसन मॅट्रिकला पयल्या नंबरने पास झाल्याचे सांगून गावी परत आला , तवा बाकीचे मित्रात हा खोटा बोलत असल्याची कुनकुन स्यामरावच्या कानावर आली होती . अडानचोट असल्याने मार्काबदल काई समजत नसले तरी आपन कस्ट करून पैसे पुरवन्याची तयारी दाकवली तरी , गरिबीचे कारन सांगत किसनने गावीस राहून सिकन्याचा घेतलेला निर्णय स्यामरावला खटकला होता . त्यापाइ मनावे की काय ग्रीस्माची कायली सरल्याव मिरगात पेरलेले हिवरे सपन स्यामरावला ढगारलेल्या आबाराखाली फुटारलेल्या भुईसारके वाटू लागले.

कोंबडा झाकून ठेवला मनुन दिस उंगवायचा थोडास रायते . काइ दिवसातस नाई नाई मनता किसनचा खरेपना साऱ्या गावभर माहीत झाला . आन स्यामरावच्या अंगातली सारी सक्ती गरून पडली . आबार फाटून ढगफुटी व्हावी यापेक्स्या मोठा आघात मेंदूला बधिर करून गेला . खतपानी घालून वाढवलेल्या झाडाला कुप न घातल्याने मोकाट ढोरांनी धडका देऊन गंडलवल्याची जानिव स्यामरावच्या अंतरात सजवलेल्या सुखद मनोऱ्याला खसवुन मातीत मिसरवुन गेली . गरिबीची कदी लाज वाटली नोवती , साबीमान मोडू न देता कस्ट करून सुखाच्यापाइ आटवलेले रकत तेलमुंग्यावानी कटाकट चावत साऱ्या पेसी बधीर करत होत्या . मनात उठलेली निष्पलतेची वाटूरली सुरकुत्या पडलेल्या चेमलेल्या आंगाला गदगदा झिनकाडत होती .

हिरोवानी दिसनारा किसन जसा सेयरात सिकायला गेला , तसा बापाच्या कस्टाचे धन त्याचे सपन चुरगाडून मुलींच्या घोडक्यात पिंगा घालू लागले . उद्याच्या उजेडासाठी पेटवलेला कंदील रगताच्या तेलाची नासाडी करत पार्ट्यांमध्ये सिगारेटी सिलगावत होता . झोपडीतून लिहिलेल्या महालाच्या पुस्तकाची पाने हॉटेलातील नाश्त्याच्या पुड्यासाठी आवरन बनू लागले होते . मनुनस स्यामरावच्या जीवनसत्राच्या आसेची बंडी किसनने वरपासची उट लावून थांबवली होती . पोरीबारीच्या नादात कंबरडे मोडेवरी लाता खाऊन किसनने स्यामरावच्या ध्येयकमानीचा गोटा वसरवुन महिरप उद्वस्त केली होती . याची सत्यता पटल्याव स्यामरावला मृगजड काय असते याची खरी वडक पटली . विचाराच्या लढाईत ‘मुलगा चांगला निगला त कमवाची गरज नाई आन मुलगा वाईट निगला त कमवून काई फायदा नाई ‘ या दुनियेतील काऱ्या दगडावरच्या रेगोटीने झोपडीतल्या काऱ्याकुट्ट अंदारात घस्याला पडलेली कोरड सारे त्राण घेऊन गेली .

Related posts

Photos : माघी यात्रा जया एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पुजा

Navratri Theme : जैवविविधतेची जांभळी छटा…

आव्हान स्वीकारून दूर करा ज्ञानाच्या मार्गातील अडथळे

2 comments

लोकराम शेंडे July 25, 2022 at 11:30 PM

*झाडीबोलीचे विद्रूपीकरण सुरू झाले काय ?*

झाडीबोलीत लिहिणारांचा मी सदैव पाठिराखा आहे!……

मरत चाललेल्या बोलीला जीवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आजवर आपले सर्वस्व वाहिले, त्यांच्या कर्तबगारीचे पवाडे गाण्याचा माझा मानस नाहीच! पण आपल्याच गावबोलीची लक्तरे,आपल्याच लोकांनी, आपल्याच वेशीवर टांगावीत?… इतका घोर अपमान सहन होत नाही….. म्हणून हा शब्दप्रपंच!

बोलीत लिहिण्यास पुढे येणे कौतुकास्पदच आहे. पण अनेक बोलींचे कालवण करून हिच ती झाडीबोली आहे, असा डौल दाखवणे कितपत योग्य ठरेल? झाडीबोलीत लिहितांना – एक प्रयत्न म्हणून जरी लिहित असाल तरीही प्रमाण अथवा इतर भाषिक शब्दांचा भरणा जास्तीत जास्त पाच ते दहा टक्के असावा (ते देखील क्षम्य नाही ). पण असे निदर्शनास येते की, पन्नास ते साठ टक्के शब्द प्रमाण व व-हाडी भाषिक दिसतात. आणि याच अनेक भाषिक शब्दांचा कालवण करून निर्मित साहित्यास आपण अस्सल झाडीबोलीतील साहित्य म्हणवून घेत असाल तर…. ही अधोगतीच होय!!! ……… आणि असं पाहून /वाचून मनात सहज शंका कुशंका येतात की आता ” *झाडीबोलीचे* *विद्रूपीकरण सुरू झाले काय* ?”

Reply
लोकराम शेंडे July 24, 2022 at 9:57 PM

कथानक सुंदर आहे. कथा सादरीकरणाची लकब छान ! पण आपण जे लिहिताय त्यात केवळ 30 ते 40 टक्केच झाडीबोलीतील शब्द आहेत. हिच झाडीबोली आहे , असे आपण व सुज्ञ वाचकांनीही समजू नये.

Reply

Leave a Comment